मनसे उपाध्यक्ष संदीप दळवींच्या पुढाकाराने अनाथ आश्रमातील मुलांसाठी बालचित्रपटाचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा थेट जनसामान्यांशी जोडला गेलेला आणि सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष असल्याचं अजून एक उदाहरण समोर आलं आहे. सध्या लोकसभेच्या अनुषंगाने मुंबईसह संपूर्ण राज्यातील वातावरण प्रचार सभांनी व्यापून गेलं असलं तरी हा बच्चे कंपनीचा सुट्यांचा काळ आहे हे विसरता येणार नाही. त्याच निमित्ताने मनसेचे उपाध्यक्ष आणि सवाई सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक संदीप दळवी यांच्या पुढाकाराने अनाथ आश्रमातील चिमूलकल्या मुलांसोबत शालेय विद्यार्थ्यांना सुट्टीतील विरंगुळा म्हणून एक स्तुत्य उपक्रम राबवला गेला.
त्यानिमित्ताने सोमवारी सकाळी विलेपार्ले पूर्व येथील सण-सिटी सिनेमागृहात बाल चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर अनाथ आश्रमातील मुलांचा आणि इतर शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता. मुलांमध्ये देखील एकमेकांबद्दल सामाजिक जवळीक वाढावी आणि सुट्टीतील विरंगुळा असा त्यामागील दुहेरी सामाजिक हेतू होता.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राजकारणासोबतच समाजकारणातील वाढता सहभाग हा भविष्यात मनसेसाठी आशादायी चित्र निर्माण करण्यात यशस्वी होईल यात अजिबात शंका नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं