Vedanta Share Price | ही कंपनी एका वर्षात पाचव्यांदा लाभांश वाटप करणार आहे, रेकॉर्ड तारीख पाहून स्टॉक खरेदी करा

Vedanta Share Price | ‘वेदांता लिमिटेड’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. चालू आर्थिक वर्ष 2022-23 साठी ‘वेदांता लिमिटेड’ कंपनीने पाचवा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. ‘वेदांता लिमिटेड’ कंपनी पात्र शेअर धारकांना 2050 टक्के प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच प्रत्येक शेअरवर गुंतवणूकदारांना 20.50 रुपये अंतरिम लाभांश मिळेल. अंतरिम लाभांश देण्यासाठी ‘वेदांता लिमिटेड’ कंपनी एकूण 7621 कोटी रुपये खर्च करणार आहे. (Vedanta Limited)
भरघोस लाभांश वाटप :
चालू आर्थिक वर्षात ‘वेदांता लिमिटेड’ कंपनीने आतपर्यंत 100 रुपयांपेक्षा जास्त लाभांश वाटप केला आहे. चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या पाचव्या लाभांशासाठी कंपनीने 7 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. खणीकर्म क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘वेदांता लिमिटेड’ चालू आर्थिक वर्षांत 4 वेळा अंतरिम लाभाश वाटप केला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये कंपनीने 12.50 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप केला होता. परत नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनीने 17.50 रुपये आणि जुलै 2022 मध्ये 19.50 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप केला होता. त्यानंतर कंपनीने मे 2022 मध्ये 31.50 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप केला होता. म्हणजेच कंपनीने सध्या चालू आर्थिक वर्षात एकूण 101.50 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप केला आहे.
कार्यवाहक सीएफओचा पदत्याग :
‘वेदांता लिमिटेड’ कंपनीने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेबीला कळवले आहे की, ‘अजय गोयल’ यानी कंपनीच्या कार्यवाहक मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजेच सीएफओ पदाचा राजीनामा दिला आहे. गोयल यांचा राजीनामा 9 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे, अशी माहिती कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये सादर केली आहे. अजय गोयल यांनी नवीन संधी शोधण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
गुंतवणुकीवर परतावा :
वेदांता कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 29.26 टक्के कमजोर झाले आहेत. 29 मार्च 2022 रोजी वेदांता कंपनीचे शेअर्स 410.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.84 टक्के वाढीसह 282.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 14 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. तर वेदांता कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 440.75 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 205.10 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vedanta Share Price on 29 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं