पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेतली म्हणून आयएएस अधिकारी निलंबित

भुवनेश्वर: दिनांक १६ एप्रिल २०१९ रोजी ओडिसा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन यांना निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले आहे. मंगळवारी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी संबलपूर लोकसभा मतदारसंघात सभेसाठी आले होते त्यावेळेस त्यांच्या हेलिकॉप्टरमधील साहित्याची तपासणी मोहम्मद मोहसिन आणि त्यांच्या टीमने केली होती.
मोहम्मद मोहसिन हे 1996 च्या बॅचमधील कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी एसपीजी सुरक्षेतील महनीय व्यक्ती या अशा प्रकारच्या तपासणीपासून मुक्त असतानाही त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. यामुळे त्यांचे निलंबन झाल्याचे एक वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले.
या तपासणीमुळे पंतप्रधानांना तेथे 15 मिनिटे थांबावे लागले होते. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचेही हेलिकॉप्टर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मंगळवारी तपासले होते. तसेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेही हेलिकॉप्टर संबलपूरमध्ये मंगळवारी तपासण्यात आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टर मधून उतरवलेल्या काळ्या बॉक्सचं रहस्य अजून कायम आहे. कदाचित त्याच पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली असावी.
सध्या विविध पक्षांकडून भारतीय निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले जात आहेत. निवडणूक आयोगाने सक्त ताकीद देऊन सुद्धा नरेंद्र मोदी तसेच सगळे भाजपवाले शहीद जवान आणि सर्जिकल स्ट्राईक चा खुला उल्लेख सर्व सभांमध्ये करताना दिसत आहेत. तसेच ते शहीद जवानांच्या नावाने लोकांना भाजपसाठी मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं