सत्तेत असून सेनेने भाजपाला साथ दिली नाही, मग जनतेला कशी देतील? आ. नितेश राणे

कुडाळ: युतीच्या सत्तेत असताना भारतीय जनता पक्षासोबत राहू शकली नाही ती शिवसेना जनतेच्या हितासाठी कशी राहील? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी नेरूर येथील जाहीर सभेत उपस्थित करून शिवसेनेच्या थापांना मतदारांनो आता तुम्ही बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नेरूर चव्हाटा येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम माजी सरपंच देवेंद्र नाईक, वालावल सरपंच निलेश साळसकर, उपसरपंच संदेश मठकर, माजी सरपंच अजय कदम, माजी सरपंच प्रमोद नाईक, ग्रामपंचायत सदस्य सौ. रचना नेरूरकर, श्यामा गावडे, माजी सरपंच राजा प्रभु, चंद्रकांत वालावलकर आदी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांनी सांगितले की, खासदाराचे काम हे पाणंद करण्याचे नाही तर जनतेसाठी रोजगार निर्माण करणे त्यासाठी केंद्रस्तरावरील योजना राबविण्याचे काम आहे. सध्या बीएसएनएलची रेंज गेली आहे. त्यासाठी पर्याय काय काढले? असा सवाल उपस्थित करून खासदार, आमदार, पालकमंत्री हे निष्क्रिय आहेत. यांनी कोणतेही ठोस काम केलेले दाखवून द्या असे सांगून युती सरकारमध्ये असताना भारतीय जनता पक्षावर सातत्याने आरोप केले आणि आता त्यांचे गुणगान गात आहेत त्यावरून त्यांची निती काय आहे हे लक्षात घ्या. असे सांगून चिपी विमानतळावर जो रोजगार निर्माण करायला हवा तो हे सत्ताधारी करू शकले नाहीत. पण भविष्यात तस होणार नाही. यापुढे तुम्ही शिवसेनेच्या भुलथापांना बळी पडू नका. आणि २३ एप्रिल रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना मतदान करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला यामध्ये चेंदवण येथील शिवसेना ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र परब, नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत सदस्या रचना नेरूरकर, चेंदवण शिवसेना जेष्ठ कार्यकर्ते व अतुल बंगे समर्थक दादा ठुबंरे, वालावल समतानगर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी गितांजली गुरूनाथ वालावलकर व तेथील इतर महिला कार्यकर्ते, वालावल गावचे माजी शिवसेना विभाग संपर्क प्रमुख सतिश वालावलकर, माजी सरपंच रविंद्र नेरूरकर यांनी प्रवेश केला. तर यावेळी तालुका कार्यकारीणी सदस्यांची नावे जाहिर करण्यात आली यामध्ये परिघा मुकुंद चौधरी, सुवर्णा महेंद्र देसाई, सतिश वालावलकर, संजय परब, शेखर परब, विकास गोसावी यांची निवड करण्यात आली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं