TCS Share Price | टीसीएस'चे तिमाही निकाल जाहीर! शेअरच्या किमतीवर परिणाम होणार? काय असेल टार्गेट प्राईस?

TCS Share Price | ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ ही भारतातील दिग्गज आयटी कंपनी मार्च 2023 तिमाहीमध्ये महसूल आणि प्रॉफिट मार्जिनच्या बाबतीत तज्ज्ञांच्या आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाही. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ब्रोकरेज फर्मने टीसीएस कंपनीच्या लक्ष किमतीत कपात केली आहे. Nomura फर्मने टीसीएस कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 2,850 रुपये वरून कमी करून 2,830 रुपये निश्चित केली आहे. तर इतर काही ब्रोकरेज फर्मने टीसीएस स्टॉकची लक्ष्य किंमत 2,638 रुपये निश्चित केली आहे. (Tata Consultancy Services Ltd)
‘मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीज’ फर्मने ‘टीसीएस’ कंपनीच्या बाबतीत सकारात्मक मात्र व्यक्त केले आहे. त्यांनी स्टॉकसाठी 3,860 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी टीसीएस कंपनीचे शेअर्स 1.53 टक्के घसरणीसह 3,192.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3710.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2926 रुपये होती. ‘जेपी मॉर्गन’ फर्मने टीसीएस कंपनीच्या शेअरची लक्ष्य किंमत 2,700 रुपये निश्चित केली आहे. तर सिटी फर्मने 3,000 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. जेफरीज फर्मने 3,375 रुपये, CLSA ने 3,550 रुपये, मॉर्गन स्टॅनले ने 3,350 रुपये, तर बर्नस्टीन ने 3,560 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.
टीसीएस मार्च तिमाही निकाल :
टीसीएस कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2022-23 चौथ्या तिमाहीत 14.8 टक्क्यांच्या वाढीसह 11,392 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. या कंपनीने माहिती दिली की, मागील आर्थिक वर्ष 2021 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नाव 9,959 कोटी रुपये होता. भांडवल बाजार मूल्यांकनानुसार भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस ने जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत 16.9 टक्क्यांच्या वाढीस 59,162 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या त्याच तिमाहीत कंपनीने 50,591 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने फर्मने सांगितले की, कंपनीच्या तंत्रज्ञानावरील खर्चावर घटत्या मागणीचा परिणाम झाला आहे. अमेरिकन बँकांमधील गोंधळ आणि आर्थिक घटनांमुळे विशेषतः यूएसमधील उद्योगांच्या विस्तृत संचाने आयटी कंपन्या अधिक खर्च करण्यात सावधगिरी बाळगत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | TCS Share Price on 14 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं