अजब! उद्धव म्हणाले माझं ‘डासां’सोबत रक्ताचे नाते, तर राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

मुंबई : धारावीतील रहिवाशांना जो डास चावतो तोच डास मला देखील चावतो. त्यामुळे आपले रक्ताचे नाते आहे, अशी अजब भावनिक साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांना घातली. शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांच्या जाहीर सभेचे रविवारी आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे ज्या घाणीमुळे डास निर्माण होतात किंवा वाढतात त्यावर त्यांना काहीच बोलावसं वाटलं नाही. प्रचारात विकासावर बोलण्याचं त्यांचं धाडसच दिसून येत नाही आणि वायफळ विषयांवर अधिक भर देताना उद्धव ठाकरे दिसत आहेत.
धारावीपासून उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान नजिकच्या अंतरावर आहे. त्यामुळे धारावीकरांसोबत जवळीकता दाखविण्यासाठी त्यांनी धारावीतील ‘डासां’सोबत रक्ताचे नाते असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, उद्धव यांचे निवासस्थान वांद्रे-कलानगर या अलिशान परिसरात आहे. त्यामुळे धारावीकरांशी त्यांनी जोडलेले रक्ताचे नाते म्हणजे गोरगरीब लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याच्या भावना स्थानिक मतदारांकडून व्यक्त करण्यात आल्या.
उद्धव ठाकरे यांनी डासांसोबत आपले रक्ताचे नाते सांगताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर मात्र नाव न घेता टीका केली. काहीजण यांना मते देऊ नका म्हणतात. मग कुणाला मते द्यायची ते तरी सांगा ? कॉंग्रेस – एनसीपीच्या गुणाचे पुतळे आहेत का ? आम्ही का नको हे तरी सांगा अशा शब्दांत उद्धव यांनी मनसेला सवाल केला. फर्लांगभर अंतरावर धारावी आहे. परंतु ‘मी फार दिवसानंतर धारावीत आलो असल्याचेही’ उद्धव ठाकरे यांनी यावेळी कबूल केले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं