Gold Price Today | सुवर्ण संधी! आज सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरगुंडी, पटापट आजचे तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Price Today | कुटुंबात लग्न झाल्यामुळे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील तर निराश होऊ शकता. बुधवारी सोने आणि चांदीच्या घसरणीनंतर आज दोन्ही धातूंमध्ये प्रचंड तेजी दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत होते. बुधवारी संध्याकाळी सोन्याचे दर 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली आले होते. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात संमिश्र तेजी दिसून आली. सध्या 60,000 रुपयांच्या वर चाललेले सोने अक्षय्य तृतीयेला 65,000 चा टप्पा गाठू शकेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
65,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो दर
फेब्रुवारी 2023 मध्ये सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र त्यानंतर त्यांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. भविष्यात सोन्याचे दर 65,000 रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचे दर ८०,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बुधवारी सोन्याचा भाव 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली घसरला होता. पण आज तो जुन्या किमतीपर्यंत पोहोचला आहे.
सोन्याचा दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा किती घसरलं आहे?
सोनं आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 264 रुपयांनी स्वस्त आहे. याआधी 13 एप्रिल 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचे दर 60880 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचलं होतं. तर चांदीही 2094 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली ट्रेड करत आहे. १३ एप्रिल रोजी चांदीने ७५८६९ रुपयांचा उच्चांक गाठला होता.
आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात काय बदल?
इंडिया बुलियन्स असोसिएशनकडून सराफा बाजाराचे दर दररोज जाहीर केले जातात. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,517 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीच्या दरातही वाढ झाली आणि ती 75112 च्या पातळीवर पोहोचली. गुरुवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 46,275 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 45,434 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
एमसीएक्सवर गुरुवारी संमिश्र कल
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) गुरुवारी सकाळी सोने आणि चांदीच्या दरात संमिश्र कल दिसून आला. एमसीएक्सवर गुरुवारी सोने 72 रुपयांनी वधारून 60360 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 106 रुपयांनी वाढून 75366 रुपये प्रति किलो झाली. याआधी बुधवारी सोने 60288 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 75512 रुपये पातळीवर बंद झाली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gold Price Today Updates check details on 20 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं