आज राज ठाकरेंची तोफ नाशकात धडाडणार, दत्तक नाशिकची पोलखोल होणार?

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नाशिक शहरात जाहीर सभा होत आहे. शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर सभा होणार असून राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर दुसर्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची सभा होत असल्याने राज ठाकरे जहरी शब्दात टीका करतात की, नरमाईची भूमिका घेतात याविषयीची उलट-सुलट चर्चा शहरात सुरू आहे.
लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराला आता अवघे दोन दिवस उरले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच गेल्या अनेक महिन्यामध्ये राज ठाकरे यांची शहरात जाहीर सभा झालेली नाही. अलीकडील राज ठाकरे यांच्या सभा राज्यभर गाजत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्याच्या सभेत काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं