Warren Buffett on AI | अणुबॉम्बचा शोध लागल्यानंतर त्याचा फायदा सोडून उलटंच घडलं, AI बाबतही तेच होईल - वॉरेन बफे

Warren Buffett on AI | दिग्गज गुंतवणूकदार आणि बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला धोकादायक ठरवत त्याची तुलना अणुबॉम्बशी केली आहे. बर्कशायर हॅथवेच्या वार्षिक सभेत बोलताना बफे म्हणाले की, एआय सर्व काही करू शकते. ते थांबवणे आमच्या हातात येणार नाही. एआय सर्व काही बदलू शकते. पण माणसाची विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत तो बदलू शकत नाही. अणुबॉम्बचा शोधही चांगल्या कामांसाठी लागला. मात्र, उपयोग वेगळाच झाला.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, बर्कशायर हॅथवेची वार्षिक बैठक ओमाहा, नेब्रास्का येथे पार पडली. एअर इंडियाचे जनक म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन यांनी एआयला मानवतेसाठी घातक असल्याचे वर्णन केल्यानंतर वॉरेन बफे यांनी एआयवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जगासाठी धोकादायक ठरवत हिंटन यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.
एआय’ची तुलना अणुबॉम्बशी का करावी?
वॉरेन बफे म्हणाले, “जेव्हा कोणी सर्व प्रकारची कामे करण्यास सक्षम होते तेव्हा मला थोडी काळजी वाटते. कारण मला माहित आहे की आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. दुसऱ्या महायुद्धात आपण अणुबॉम्बचा शोध खूप चांगल्या कारणासाठी लावला होता, हे तुम्हा सर्वांना माहितच आहे. पण, पुढील दोनशे वर्षे ते चांगलं ठरलं का?
AI सर्व काही करू शकते
वॉरेन बफे म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्व काही करण्यास सक्षम आहे. केवळ मानवी मेंदूचा विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत बदलू शकत नाही. बफे म्हणाले की, अणुबॉम्बचा शोध लागल्यानंतरही त्याचा मोठा फायदा होईल, असे म्हटले जात होते. पण, उलटं घडलं.
जेफ्री हिंटन यांनी देखील घटक म्हटले
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक मानले जाणारे जेफ्री हिंटन यांनी गेल्या आठवड्यात गुगलला जीवघेणा ठरवत त्याचा राजीनामा दिला होता. अनेक एआय-आधारित उत्पादने विकसित करण्यात हिंटन आघाडीवर आहे. हिंटन म्हणाले की, एआय क्षेत्रातील स्पर्धा थांबविणे अशक्य आहे. याचा परिणाम असा होईल की, इतके फेक इमेजेस आणि मजकूर असतील की सत्य काय आहे हे कोणीही सांगू शकणार नाही. हे खूप भयानक असू शकते. एआयला चुकीच्या हातात पडण्यापासून रोखणे हे एक अशक्य काम आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Warren Buffett alert on AI technology check details on 08 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं