Jupiter Hospital IPO | 'ज्युपिटर हॉस्पिटल' IPO लाँच होण्यास सज्ज, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, हे आहेत IPO तपशील

Jupiter Hospital IPO | सध्या तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस परतावा कमवू इच्छित असाल तर तुमच्या साठी एक आनंदाची बातमी आली आहे. ‘ज्युपिटर हॉस्पिटल’ ही कंपनी लवकरच आपला IPO लाँच करणार आहे. खाजगी हॉस्पिटल्स चालवणाऱ्या ‘ज्युपिटर हॉस्पिटल’ कंपनीचा लवकरच बाजारात दाखल होणार आहे.
कंपनीने नुकताच सेबीकडे IPO साठी DRHP सादर केला आहे. DRHP नुसार, ‘ज्युपिटर हॉस्पिटल’ कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 615 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. या IPO मधे कंपनी 44,50,000 शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे.
मीडिया रिपीटनुसार, ‘ज्युपिटर हॉस्पिटल’ कंपनीच्या IPO चा एकूण आकार 900 ते 1100 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये डॉ अजय ठक्कर आणि डॉ अंकित ठक्कर आणि वेस्टर्न मेडिकल सोल्युशन्स एलएलपी हे सामील आहेत.
ज्युपिटर हॉस्पिटल कंपनीचे मुख्यालय मुंबईमध्ये स्थित आहे. ही कंपनी महाराष्ट्रातील डोंबिवली येथे रुग्णालय उभारण्याची तयारी करत आहे. तसेच कंपनीने एप्रिल 2023 पर्यंत 463 कोटी रुपये कर्ज परतफेड करण्याची योजना आखली आहे. ‘ज्युपिटर हॉस्पिटल’ कंपनी सध्या 3 रुग्णालये चालवत आहे.
या हॉस्पिटलची बेड क्षमता 1194 खाटांची आहे. मार्च 2022 पर्यंत ज्युपिटर हॉस्पिटल कंपनीने 733 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्याच वेळी 2022 च्या पहिल्या 9 महिन्यांत कंपनीने 650 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Jupiter Hospital IPO today on 13 may 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं