मोदींच्या काळातच नव्हे तर यूपीएच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक झाले: निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा

जयपूर: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाकडून सर्जिकल स्ट्राइकवरुन दावे प्रतिदावे सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर २०१६ मध्ये म्हणजे मोदींच्या काळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे. त्याप्रमाणे लष्करानं यापूर्वीदेखील सीमा ओलांडून सर्जिकल स्ट्राइक केल्याचं हुडा यांनी म्हटलं. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात ६ सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्याबद्दल प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला हुडा यांनी उत्तर दिलं.
‘भारतीय लष्करानं याआधीही सीमा ओलांडून कारवाया केल्या आहेत. परंतु, त्या नेमक्या कुठे आणि कधी केल्या याची मला कल्पना नाही,’ असं हुडा यांनी जयपूरमध्ये पत्रकारांना सांगितलं. तसेच भारतीय लष्कराच्या कामाचं राजकारण करणं अयोग्य असल्याचं सुद्धा ते पुढे म्हणाले. ‘लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लष्कराला आणणं योग्य नाही. निवडणूक आयोगानंदेखील तशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रचारात लष्कराच्या कामगिरीचा वापर होणं दुर्दैवी आहे. दीर्घकालीन परिस्थितीचा विचार केल्यास याचे लष्करावर प्रतिकूल परिणाम होतात,’ असं हुडा यांनी म्हटलं. भारतीय लष्करानं उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये हुडा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या भाषणांमध्ये अनेकदा राष्ट्रीय सुरक्षा आणि सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करत आहेत. मोदींच्या या भाषणांवर काँग्रेसकडून टीका होत आहे. गेल्याच आठवड्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यावर भाष्य करताना मोदींवर शरसंधान साधलं. यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाले. मात्र लष्करानं केलेल्या कारवायांचा आम्ही कधीही मतांसाठी वापर केला नाही, असं सिंग म्हणाले. यानंतर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. काँग्रेसनं ठिकाणं आणि तारखांसह सर्जिकल स्ट्राइक्सची माहिती पत्रकारांना दिली. यावरुन केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसवर निशाणा साधला. यूपीए सरकारनं केलेले सर्जिकल स्ट्राइक अदृश्य होते, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं