माझा फोनही टॅप केला जातो, सरकार या पातळीला जाईल याची कल्पनाही नव्हती - राहुल गांधी

Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी दहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात एका कार्यक्रमाला संबोधित केले आणि टेक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची ही भेट घेतली. यावेळी त्याने पुन्हा एकदा माझी हेरगिरी केली जाते आणि माझा फोनही टॅप केला जातो, असा आरोप केला.
कार्यक्रमाच्या दरम्यानच राहुल गांधीयांनी आपला मोबाईल काढला आणि म्हणाले ‘हॅलो मिस्टर मोदी’! “मला वाटतं माझा मोबाईल टॅप होतोय. आपल्याला एक राष्ट्र म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून डेटा माहितीच्या गोपनीयतेबद्दल नियम बनविणे आवश्यक आहे.
“माझा आयफोन ‘टॅप’ झाला होता. एखाद्या देशाच्या सरकारने तुमचा फोन ‘टॅप’ करायचे ठरवले तर ते कोणीही रोखू शकत नाही. ही माझी समजूत आहे. देशाला फोन टॅपिंगमध्ये रस असेल तर ही लढाई लढण्यासारखी नाही, असा दावा काँग्रेस नेत्याने केला. मला वाटते की मी जे काही करतो ते सरकारसमोर आहे. यावेळी राहुल गांधी यांनी टेक एंटरप्रेन्योर आणि स्टार्टअप्स चालवणाऱ्या अनेक व्यावसायिकांची भेट घेतली. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा आणि त्यांचा मानवजातीवर होणारा परिणाम यावर भाष्य केले.
‘अब्रुनुकसानीचे इतके खटले दाखल झालेली मी पहिली व्यक्ती आहे’
यावेळी काँग्रेस नेते आणि टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञ सॅम पित्रोदा देखील उपस्थित होते. राहुल गांधी यांनी बुधवारी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात एका कार्यक्रमाला संबोधित केले. राहुल गांधी म्हणाले की, विरोधक आज संघर्ष करत आहेत. मानहानीचे इतके खटले दाखल झालेली मी बहुधा पहिलीच व्यक्ती आहे.
सरकार एवढ्या खालच्या पातळीवर जाईल याची कल्पना नव्हती – राहुल गांधी
भाजपने सर्व संस्था ताब्यात घेतल्या आहेत. कोणत्याही संस्थेकडून आमचा आवाज ऐकूण घेतला जातं नाही, तेव्हा भारत जोडो यात्रा काढण्यात आली. इतकंच नाही तर मला काश्मीरला जाण्यापासून ही रोखण्यात आलं आणि तिथे गेलो तर मला ठार मारलं जाईल अशा बातम्या देखील पेरण्यात आल्या, असं राहुल गांधी म्हणाले. हे लोक एवढ्या खालच्या पातळीवर जातील याची मला कल्पना नव्हती, असे राहुल गांधी म्हणाले.
News Title : Rahul Gandhi in America check details on 01 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं