भाजप कार्यकर्त्यांचे स्टंट! रॉबर्ट वाड्रा मुंबादेवीच्या दर्शनासाठी आले तिथेही मोदींच्या नावाने घोषणा

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या उतावळ्या कार्यकर्त्यांचं आजदेखील पुन्हा दर्शन झालं. एखादी गोष्ट कोणत्या ठिकाणी करावी याचं देखील त्यांना भान नसतं असाच काहीसा प्रकार आज घडला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं मतदान देखील पार पडलं आहे. मात्र काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आज मुंबईतील सुप्रसिद्ध मुंबादेवीचे दर्शन घेतले. परंतु वाड्रा दर्शनानंतर परतत असताना मंदिराच्या आवारातील काही लोकांनी त्यांच्यासमोर मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. यावेळी प्रसार माध्यमांनी रॉबर्ट वाड्रा यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी राजकीय विषयावर बोलण्यास नकार दिला.
दरम्यान वाड्रा देवदर्शन घेऊन परतत असताना ज्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा दिल्या, त्या लोकांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, आम्हाला पुन्हा एकदा मोदी सरकार हवे आहे, म्हणून आम्ही घोषणा दिल्या. त्यानंतर प्रसार माध्यमांनी घोषणा देणाऱ्या लोकांना तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहात का? असे विचारल्यावर ते म्हणाले की आम्ही भाजपचे लोक आहोत. परंतु आम्ही स्वतःहून घोषणा दिल्या आहेत. आम्हाला कोणीही घोषणा देण्यास सांगितले नव्हते अशी आधीच सारवासारव केली आणि अप्रत्यक्षरित्या यामागे कोणीतरी असल्याचा पुरावाच दिला.
तसेच यावेळी प्रसार माध्यमांनी रॉबर्ट वाड्रा यांच्याशीदेखील संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या विधानावरुन देशभरातलं वातावरण तापलेलं आहे. याबाबत वाड्रा यांनादेखील माध्यमांनी विचारणा केली. परंतु यावर वाड्रा म्हणाले की, मी मंदिरात देवदर्शनासाठी आलो आहे, चांगलं दर्शनदेखील झालं आहे. त्यामुळे यावेळी मी राजकारणावर काहीही बोलणार नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं