सेल्फ डिफेन्सचे धडे घेताघेता शिवसेनाच अक्षयच्या डिफेन्समध्ये, त्याची कॅनडीयन नागरिकत्व तांत्रिक बाब

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर भाष्य करतानाच अभिनेता अक्षय कुमारचे नागरिकत्वाच्या मुद्दावरुनही समर्थन केले आहे. अक्षय कुमार हा अस्सल हिंदुस्थानी आहे. त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वाचा विषय ही एक तांत्रिक बाब आहे.
गेल्या काही वर्षांत अक्षयकुमारने शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आपल्या कमाईतील मोठा वाटा दिला आहे. तरुणवर्गात देशभक्तीचा जोश निर्माण करण्यासाठी अक्षय गेली अनेक वर्षे अनेक उपक्रम राबवीत आहे. त्यामुळे हे वाद निरर्थक आहेत असे अग्रलेखात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी ‘आयएनएस विराट’ या युद्धनौकेचे खासगी पर्यटन टॅक्सी सारखा वापर केल्याचा आरोप केला. त्यावरुन काँग्रेसच्या मंडळींनी अक्षयकुमारलाही पंतप्रधान मोदी यांनी एका युद्धनौकेवर नेल्याचे प्रकरण काढले. अक्षय कुमारला युद्धनौकेवर नेल्याचे प्रकरण काढणे हा पोरकटपणा आहे. या दोन्ही प्रकरणांत जमीन-अस्मानचे अंतर आहे असे शिवसेनेने काँग्रेसला सुनावले आहे.
वास्तविक अगदी नुकत्याच आलेल्या ‘फणी’ वादळामुळे देशातील अनेक राज्यात मोठी हानी झाली होती. त्याचा फटका अनेक राज्यांना बसला होता. मात्र भाजप किंवा भाजपच्या सहकारी पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांना मदत करून त्याने समाजसेवेचा नवा पायंडा पाडला. तसा तो भाजपचा अघोषित ब्रँड अँबेसिडर आहे हे लपून राहिलेलं नाही. त्यात सेलिब्रेटींच्या नावाने अर्थात अक्षय कुमारच्या नावाने सध्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे स्वतःच मार्केटिंग जोरदारपणे करताना दिसत आहेत, मात्र लहान मुलींना सेल्फ डिफेन्सचे धडे देताना राज्यातील महिलांवर आणि लहान मुलींवर होणाऱ्या लैंगिक आणि बलात्काराच्या घटनांचे प्रमाण पाहिल्यास अशा ट्रेनिन्ग या स्वतःच्या मार्केटिंगसाठी केलेला एकदिवसाचा खेळ असंच म्हणावं लागेल. त्यामुळे अक्षय कुमार जे करेल ते अंतिम सत्य आणि खरी देशभक्ती असाच भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षाचा समज.
बॉलिवूड करोडपती सुपरस्टार अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्वीनकल खन्ना या दोघांनी थोड्याशा डोनेशनसाठी नौदल गणवेशाचा लिलाव करून ‘भारतीय नौदलाच्या भावनांशी खेळत’ असल्याचा आरोप करत त्यांना काही महिन्यांपूर्वी कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली होती. अभिनेता अक्षय कुमारने ‘रूस्तम’ चित्रपटातील भारतीय नौदल अधिकाऱ्याचा गणवेश लिलावात ठेऊन जाहीरपणे विकल्यामुळे ११ लष्कर अधिकारी आणि इतर ८ अधिकाऱ्यांनी बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारला ही नोटीस पाठवली होती.
तसेच एका लष्करी अधिकाऱ्याने नौदलाचा स्वाभिमान असणाऱ्या वर्दीचा लिलाव न करण्याची विनंती अक्षय कुमारची पत्नी ट्विंकलला केली होती. परंतु तसे न केल्यास दोघांना थेट न्यायालयात खेचण्याचा इशारा या अधिकाऱ्याने अक्षय कुमार आणि ट्वीनकल खन्नाला दिला होता. अक्षय कुमारला सूचना पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये एका नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीचा आणि ७ निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं