राजकारणात उशिरा सक्रिय होणं ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक: प्रियांका गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय राजकारणात एण्ट्री केली आहे. त्यांच्या एण्ट्रीने उत्तर प्रदेशच्या राजकारणावर नक्की काय परिणाम होणार, याबाबत आता जोरदार चर्चाही यापूर्वीच सुरू झाली आहे. आता प्रियांका गांधी यांनी आपल्या राजकीय प्रवेशाच्या ‘टायमिंग’वर भाष्य केलं आहे.
प्रियांका गांधी यांनी एका खासगी वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रियांका म्हणाल्या की, ‘राजकारणात उशिरा सक्रिय होणं ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक होती.’
दरम्यान, प्रियांका गांधी यांनी राजकारण यावं, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र कौटुंबिक कारणामुळे प्रियांका यांनी सक्रिय राजकारणात उडी घेण्याचं टाळलं. २०१७ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही प्रियांका गांधींनी नेतृत्व करावं, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रियांका यांनी आपल्या सक्रिय राजकारणातील प्रवेशासाठी लोकसभा निवडणुकीचा मुहुर्त निवडला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं