RO Jewels Share Price | आरओ ज्वेल्स कंपनीचे शेअर्स रोज अप्पर सर्किट तोडत आहेत, स्टॉक वाढीचे नेमकं कारण काय?

RO Jewels Share Price | आरओ ज्वेल्स या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यापासून सातत्याने अप्पर सर्किट हीट केट करत आहेत. मागील 6 ट्रेडिंग सेशनपासून आरओ ज्वेल्स कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. या शेअर्समध्ये ही तेजी मार्च 2023 तिमाहीच्या बाजारात निकालानंतर पाहायला मिळाली आहे. खरेतर 2022-23 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आरओ ज्वेल्स शेअरमध्ये खरेदी वाढली.
या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरची किंमत 4.64 रुपयेवरून वाढून 7.08 रुपये प्रति शेअर किमतीवर पोहचली. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के घसरणीसह 6.69 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
RO ज्वेल कंपनीचे शेअर्स सोमवारी सुरुवातीच्या काही तासात 7.08 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. हिरे आणि दागिन्यांचा व्यापार करणाऱ्या या कंपनीच्या स्टॉकने मागील एका आठवड्यात लोकांना 40 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 35 कोटी रुपये आहे.
चौथ्या तिमाहीत आरओ ज्वेल्स कंपनीचा महसूल 46.79 कोटी रुपये वरून वाढून 900 टक्क्यांच्या वाढीसह 506.52 कोटी रुपयेवर पोहचला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांमध्ये RO जेम्स अँड ज्वेलरी कंपनीने EBITDA मध्ये 1000 टक्क्यांची उसळी नोंदवली आहे. जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीत आरओ ज्वेल्स कंपनीच्या PAT मध्ये 1050 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. आरओ ज्वेल्स कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या 33.98 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत 1345 टक्के वाढीसह 491.25 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
आरओ ज्वेल्स कंपनीने नुकताच आपले शेअर्स विभाजित केले होते. या मायक्रो कॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. BSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार RO Jewels कंपनीचे शेअर्स 17 मार्च 2023 रोजी 1 : 5 या प्रमाणात विभाजित करण्यात आले होते. आणि 2 जुलै 2022 रोजी या मायक्रो कॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना 82:32 या प्रमाणात बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. याचा अर्थ असा की स्मॉल कॅप स्टॉक होल्डर्सना प्रत्येक 32 शेअर्सवर कंपनीने 82 बोनस शेअर्स मोफत वाटप केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RO Jewels Share Price today on 13 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं