परीक्षा आली! 'देवा मला पास कर' तशी 'त्यांची' आजची अवस्था?

रुद्रप्रयाग: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथाचं दर्शन घेतलं आणि त्याचे थेट प्रक्षेपण देशभरातील वृत्त वाहिन्यांवर होईल याची देखील दक्षता घेतल्याचे पाहायला मिळाले. मोदींनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विशेष पूजा केली. यानंतर मोदी केदारनाथमध्ये ध्यान करणार आहेत. मोदींचा उत्तराखंड दौरा दोन दिवसांचा आहे. यानंतर ते सोमवारी (१९ मे) बद्रिनाथला जातील.
आज सकाळी मोदी उत्तराखंडला पोहोचले. त्यानंतर तिथून ते केदारनाथमध्ये दाखल झाले. मोदींचा मागील ५ वर्षांमधला हा चौथा केदारनाथ दौरा आहे. मोदींनी मंत्रोच्चरात विशेष पूजा केली. पुजाऱ्यांनी त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आणि चंदनाचा टिळा लागला. त्यानंतर पंतप्रधानांनी मंदिरात बराच काळ साधना केली. मोदींनी मंदिराला प्रदक्षिणा घालत उपस्थित भाविकांना अभिवादनही केलं.
दरम्यान ७व्या टप्प्यातील प्रचार संपला असून उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र त्यानंतर घेतलेली मौनी पत्रकार परिषद चांगलीच चर्चेत आली. परंतु त्यानंतर देखील प्रसार माध्यमांच्या चर्चेत राहण्यासाठी सकाळपासून मंदिरात बसून ‘देवा मला पास कर’ असं अभ्यास न करता देवाकडे रडगाणं गाणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी त्यांची अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यापेक्षा अभ्यास उत्तम केला असता तर ही वेळच आली नसती याचा त्यांना विसर पडला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं