Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल कंपनीचे अधिग्रहण पूर्ण झाले, शेअर मध्ये जबरदस्त तेजी येणार, स्टॉक तपशील जाणून घ्या

Reliance Capital Share Price | अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल या कर्जबाजारी कंपनीला हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीने खरेदी केले आहे. इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज कंपनीने बोलीच्या दुसऱ्या फेरीत सर्वाधिक म्हणजेच 9,661 कोटी रुपयेची बोली जाहीर केली आहे. आणि कर्जदात्याची 99 टक्के मते इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स कंपनीला मिळाले आहेत.
कारण 9,661 कोटी रुपये रोख पेमेंटमधून कर्जदात्यांचे कर्ज परतफेड केले जातील. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 8.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.49 टक्के वाढीसह 9.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
संपूर्ण तपशील
रिलायन्स कॅपिटल कर्जदात्याचे कर्ज परतफेड करण्यासाठी रिलायन्स कॅपिटल कंपनीकडे असलेली 500 कोटी रुपये रोख रक्कम कर्जदात्यांना दिली जाणार आहे. रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या कर्जदात्याना 10,200 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. रिलायन्स कॅपिटल कंपनीची एकूण 16,000 कोटी रुपये कर्ज असून फक्त 65 टक्के कर्ज परतफेड केले जाणार आहे.
रिलायन्स कॅपिटल कंपनीचे प्रशासक पुढील आठवड्यात नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या मुंबई खंडपीठासमोर IIHL च्या अधिग्रहण प्रस्ताव मांडणार आहेत. ही संकल्प योजना सादर करण्याचा शेवटचा दिवस 15 जुलै 2023 हा आहे.
IIHL कंपनीच्या संकल्प योजनेवर 9 जून 2023 रोजी मतदान घेण्यात आले. कर्जदात्याच्या समितीने पहिल्या फेरीत 9,500 कोटी रुपयेची किमान बोली मर्यादा जाहीर केली होती. तर एप्रिल 2023 रोजी झालेल्या लिलावाच्या दुसऱ्या फेरीत किमान बोली मर्यादा वाढवून 10,000 कोटी रुपये केली. बोलीच्या प्रत्येक फेरीत किमान 250-250 कोटी रुपये वाढ करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर 26 एप्रिल 2023 रोजी लिलावाची दुसरी फेरी पर पडली होती.
रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या रिझोल्यूशन प्लॅनवर कर्जदात्याच्या समितीचा निर्णय टोरेंट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या अपीलवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये विचारात घेण्यात आला. लिलावाच्या पहिल्या फेरीनंतर रिलायन्स कॅपिटल कंपनीची रिझोल्यूशन प्रक्रिया कायदेशीर पेचप्रसंगात हेलकावे खाऊ लागली.
रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या लिलावाची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज कंपनीने बोली जाहीर केली होती. मात्र लिलावाची तारीख संपल्यानंतर इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज कंपनीकडून निविदा सादर करण्यात आल्या होत्या. या गोष्टीविरोधात टोरेंट इन्व्हेस्टमेंट कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. कारण पहिल्या फेरीत टोरेंट इन्व्हेस्टमेंट कंपनीने सर्वाधिक बोली जाहीर केली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Capital Share Price today on 30 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं