२०१४ वगळता यापूर्वी एक्झिट पोल खोटी ठरली व भलतेच निकाल आल्याचा इतिहास

मुंबई : काल लोकसभा निवडणुकीच्या ७व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपताच अनेक टीव्ही वृत्तवाहिन्यांची विविध एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलची निरीक्षणं प्रसिद्ध केली आहेत. वास्तविक २३ तारखेला खरं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान प्रसार माध्यमांमध्ये एक्झिट पोलची दिली जाणारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष निकालाचे चित्र पूर्णपणे वेगळंही असू शकतं असा पूर्व इतिहास देखील आहे. एक्झिट पोलचे अंदाज सपशेल आपटल्याची अनेक उदाहरणे आहेत. २००९ मधील एक्झिट पोलची आकडेवारी त्याच उत्तम उदाहरण ठरले आहेत. त्याव्येतिरिक्त ही अनेकदा निरनिराळ्या एजन्सीने केलेली एक्झिट पोल खोटी ठरली असल्याचे इतिहास आहे.
दरम्यान काल नव्याने आलेल्या सर्व पोलनुसार भारतीय जनता पक्षप्रणित एनडीए सत्ता स्थापन करेल असं म्हटलं आहे. तर यूपीएला पुन्हा विरोधकाच्या भूमिकेत बसण्याची वेळ येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. २०१४ ला एक्झिट पोलचे बहुतांश अंदाज खरे ठरले पण त्याआधीच्या सलग २ लोकसभा निकालांआधी हे अंदाज सपशेल आपटले. २००४ आणि २००९ मधील एक्झिट पोलच्या अंदाजावर पाणी फेरले गेले होते. त्यावेळी एक्झिट पोलच्या सर्वच एजन्सीं तोंडघशी पडले होते .
२००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार एनडीएला २२५ जागांवर तर यूपीएला १८३ ठिकाणी विजय मिळवता येईल असा अंदाज वर्तवला गेला होता. प्रत्यक्षात आलेला निकाल वेगळा होता. एनडीएला २२५ चा अंदाज असताना त्यांना १८९ ठिकाणी विजय मिळवता आला. भारतीय जनता पक्षाला फक्त १३८ जागा मिळाल्या होत्या. यूपीएला १८३ जागांचा अंदाज एक्झिट पोलने दाखवला होता. प्रत्यक्षात, मात्र त्याच यूपीएचे २२२ खासदार निवडून आले होते. त्यामुळे २००४ मध्ये एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलचे सर्व अंदाज चुकले होते.
त्यानंतर २००४ प्रमाणेच २००९ मधील परिस्थिती एक्झिट पोलची पहायला मिळाली होती. २००९ मधील लोकसभा निवडणुकीत एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार यूपीएला १९९ आणि एनडीएला १९७ जागांवर विजय मिळवता येईल असा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात यूपीएला २६२ आणि एनडीएला १५९ ठिकाणी विजय मिळवता आला होता. एक्झिट पोलच्या अंदाज यावेळी खोटा ठरला होता तर यूपीएच्या जागा मोठ्या प्रमाणावर वाढताना पहायला मिळाल्या होत्या.
२०१८ मध्ये छत्तीसगढमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सरासरी ४० जागांवर विजय मिळेल तर कॉंग्रेसचे ४६ आमदार निवडणून येतील असा अंदाज एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीतून समोर आले होते. निकाल हाती आल्यानंतर कॉंग्रेसला ६८ तर भारतीय जनता पक्षाला केवळ १५ जागांवर विजय मिळवता आला होता. यावेळी देखील एक्झिट पोलची आकडेवारी खोटी ठरली होती. त्यामुळे २०१९ लोकसभा निवडणुकीतील एजन्सींच्या एक्झिट पोलचे आकडे कितपत खरे ठरणार हे २३ रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं