अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन भाजपसोबत आले तर शिवसेना सत्तेत राहणार नाही - संजय शिरसाट

DCM Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पक्षावर आपला अधिकार असल्याचा दावा केला आहे. शरद पवार हे प्रदीर्घ काळ राष्ट्रवादीचे नेतृत्व करत आहेत. मात्र, आता राजकीय हालचाली वेगात आहेत.
अजित पवार पक्षाच्या इतर 9 नेत्यांसह आज शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हे मंत्रीपद ते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेअर करणार आहेत. तसेच आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून सत्तेत आलो आहोत असं देखील अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. मात्र आता अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याने शिंदे गट अडचणीत सापडला आहे.
शिवसेना (शिंदे गट) सत्तेत राहणार नाही – संजय शिरसाट
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन भाजपसोबत आले तर शिवसेना (शिंदे गट) सत्तेत राहणार नाही, असे संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यावेळी संजय शिरसाट यांच्या त्या वक्तव्यामुळे अजित पवार आणि भाजप यांच्यातील संभाव्य हातमिळवणीची शिंदे गटाला धास्ती असल्याचे दिसून आले होते.
त्यामुळेच संजय शिरसाट यांनी आपल्या पत्रकार परिषदेत वारंवार सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर भाजप शिंदे गटाला सोडून अजित पवार यांच्यासोबत वेगळी राजकीय चूल मांडेल, ही शक्यता फेटाळून लावली होती. मविआची सत्ता असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजित पवार यांचे फोन उचलायचे नाहीत. त्यांनी ही खंत धनंजय मुंडे यांच्याकडे बोलून दाखवली होती, असा दावा संजय शिरसाट यांनी केला होता. मात्र आता तेच अजित पवार तरी शरद पवारांचा फोन उचलतात का असा प्रश्न विचारला जातोय.
News Title : DCM Ajit Pawar with BJP now check details on 02 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं