Utkarsh Small Finance Bank IPO | पैसे तयार ठेवा, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO लाँच होतोय, हा IPO जोरदार कमाई करून देणार

Utkarsh Small Finance Bank IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. लवकरच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपला IPO बाजारात लाँच करणार आहे. मागील बऱ्याच महिन्यांपासून उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO बाबत चर्च सुरू होती, मात्र आता गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली आहे. या बँकेचा आयपीओ अद्याप लाँच झाला नाहीये, मात्र ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 15 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकच्या शेअरची किंमत बँड 23-25 रुपये निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ हा IPO उघडण्यापूर्वीच गुंतवणुकदारांना 60 टक्के नफा मिळणार हे नक्की. ग्रे मार्केटमध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक शेअर्स 15 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. यावरून असे कळते की, हा IPO बाजारात येण्यापूर्वीच शेअर्सची किंमत 60 टक्के नफ्यात आली आहेत.
जर या बँकेचे शेअर्स 25 रुपये अप्पर किंमत बँडवर वाटप केले गेले, आणि 15 रुपयेचा ग्रे मार्केट प्रीमियम किंमत टिकुन राहिली तर उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 40 रुपये किमतीवर सूचीबद्ध होतील. या बँकेच्या IPO साठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून ICICI सिक्युरिटीज आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी यांना नियुक्त करण्यात आले आहेत.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO 12 जुलै 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा IPO बुधवार दिनांक 12 जुलै 2023 ते शुक्रवार 14 जुलैपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. या IPO मधील शेअर्सचे वाटप 19 जुलै 2023 रोजी पूर्ण करण्यात येतील. आणि या बँकेच्या शेअर्सची लिस्टिंग सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी करण्यात येईल. किरकोळ गुंतवणूकदार उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO मध्ये किमान 1 लॉट आणि कमाल 13 लॉटमध्ये पैसे लावू शकतात. कंपनी एका लॉटमध्ये 600 शेअर्स जारी करणार आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आयपीओचा आकार 500 कोटी रुपये असेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Utkarsh Small Finance Bank IPO GMP Today on 11 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं