Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये जोरदार तेजी पाहून तज्ज्ञ सुद्धा सकारात्मक, स्टॉक वाढीचे कारण माहितीये? सविस्तर वाचा

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड या ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स वेगवान तेजीत वाढत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीने विविध वर्क ऑर्डर मिळाले आहेत. (Suzlon Energy Share Price)
11 जुलै 2023 रोजी कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, त्यांना केपी ग्रुपकडून गुजरात राज्यात एक प्रकल्प उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या बातमीने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.06 टक्के वाढीसह 18.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ऑर्डर तपशील :
सुझलॉन एनर्जी कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, केपी ग्रुपने 47.6 मैगावॅट पवन ऊर्जा क्षमतेच्या प्रकल्पाचे काम सुझलॉन एनर्जी लिमिटेडला दिले आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जा उपाय आणि सेवा प्रदान करणारी सुझलॉन एनर्जी लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. सुझलॉन कंपनीला S133 विंड टर्बाइन उपकरणे पुरवठा आणि पर्यवेक्षण संबंधित काम मिळाले आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी प्रकल्प मेंटेनन्स सेवाही प्रदान करणार आहे.
गुंतवणुकीवर परतावा :
मागील 1 वर्षात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मंगळवारी 17.47 रुपये किमतीवर ओपन झाले होते. काही वेळात शेअरची किंमत 18.06 रुपयेवर पोहोचली. काल सुरुवातीच्या काही तासात शेअरची किंमत 3.34 टक्क्यांच्या वाढीसह 17.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 20.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 198.39 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Suzlon Share Price today on 12 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं