3i Infotech Share Price | 3i इन्फोटेक शेअर तेजीचे संकेत, मोठी सकारात्मक बातमी आली, फायदा घेणार?

3i Infotech Share Price | 3i इन्फोटेक लिमिटेड या आयटी कंपनीने मागील काही वर्षात व्यवसाय परिवर्तन आणि महसूल वाढीचे खूप प्रयत्न केले. आता 3i इन्फोटेकला बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडकडून खूप मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने 3i इन्फोटेक या आयटी कंपनीला पायाभूत सेवांचे व्यवस्थापन करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के वाढीसह 32.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीने दिलेल्या ऑर्डरमध्ये एंड यूसेस, बीसी आणि नेटवर्क, क्लाउड मॅनेजमेंट आणि डेटा बेस मॅनेजमेंट, आयटी ऍप्लिकेशन सपोर्ट आणि रोल आउट सर्व्हिसेस संबंधित कामे दिले आहेत. 3i इन्फोटेक कंपनीला देण्यात आलेल्या या ऑर्डरचे मूल्य 19 कोटी रुपये आहे. 3i इन्फोटेक कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टची मुदत 5 वर्षे असेल.
3i इन्फोटेक कंपनीला प्राप्त झालेल्या या ऑर्डरमध्ये वन टाईम रोलआउट सेवा शुल्क म्हणून 60 लाख देण्यात आले आहेत. अशा प्रकारे, बजाज इलेक्ट्रिकल कंपनीकडून देण्यात आलेल्या या ऑर्डरचे एकूण मूल्य 19.34 कोटी रुपये आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3i इन्फोटेक कंपनीचे शेअर्स 2.35 टक्के वाढीसह 34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
3i इन्फोटेक कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 54.20 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 25.93 रुपये होती. मागील 2 वर्षांत 3i इन्फोटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर धारकांना 1100 टक्के नफा मिळाला आहे. 3i इन्फोटेक ही एक ग्लोबल आयटी कंपनी असून ती ICICI लिमिटेड कंपनीची बॅक ऑफिस प्रोसेसिंग कंपनी म्हणून देखील काम करते.
3i इन्फोटेक कंपनी मुख्यतः आयटी सेवा आणि व्यवहार यांमध्ये व्यवसाय करते. 3i इन्फोटेक कंपनीचा व्यवसाय जगभरात.50 पेक्षा अधिक देशांमध्ये विस्तारला आहे. 3i इन्फोटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 572 कोटी रुपये आहे. या कंपनीने मार्च तिमाहीत उत्कृष्ट निकाल जाहीर केले होते. कंपनीची विक्री 8 टक्क्यांच्या वाढीसह 769 कोटी रुपये नोंदवली गेली होती. तर मार्च तिमाहीत 3i इन्फोटेक कंपनीने 1 कोटी नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | 3i Infotech Share Price today on 15 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं