RVNL Share Price | सरकारी RVNL शेअर सुसाट तेजीत धावतोय, जोरदार खरेदी, स्टॉक अप्पर सर्किट तोडतोय, नेमकं कारण?

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 129.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 128.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समधील सुसाट तेजीमुळे कंपनीचे बाजार भांडवल 27000 कोटींच्या पार गेले आहे. आज शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.25 टक्के वाढीसह 136.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीला NHAI कडून 808.50 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरमध्ये NH-53 च्या चंडीखोल परादीप विभागाच्या 4 ते 8 लेनपर्यंत रेल्वे विकास पुनर्वसन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हा प्रकल्प पुढील 24 महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या प्रकल्पाचे मूल्य 808,48,28,700 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
जून 2023 या महिन्यात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला जबलपूरमधील मध्यप्रदेश पूर्व क्षेत्र विद्युत वितरण कंपनी लिमिटेड कंपनीकडून 280 कोटी रुपये मूल्याचे दोन ऑर्डर देण्यात आले होते. पहिल्या ऑर्डरमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला MPPKVVCL च्या छतरपूर सर्कलमध्ये नवीन 11 KV लाईन्स, AB केबलवरील लाईन्स पुरवठा, चालू करण्याचे काम सामील आहेत. या ऑर्डरचे एकूण मूल्य 126.8 कोटी रुपये आहे. तर दुसऱ्या ऑर्डरमध्ये सिवनी आणि नरसिंगपूर सर्कलमधील 154.23 कोटी रुपये मूल्याच्या कामाचा समावेश आहे.
यापूर्वी 20 जून 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला चेन्नई मेट्रो रेल लिमिटेडकडून भूमिगत स्थानक निर्माण करण्याची ऑर्डर मिळाली होती. या ऑर्डरचे एकूण मूल्य 2,326 कोटी रुपये आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने 08 मे 2023 रोजी 144.50 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 15 जुलै 2022 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने 30.30 रुपये ही नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील एका वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 342.56 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RVNL Share Price today on 21 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं