मोदी समर्थकाची अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमकी

मुंबई : लोकसभा निवडणुकींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला मोठं यश प्राप्त झालं आहे. दरम्यान या यशाबद्दल दिग्दर्शक अनुराग कश्यप याने पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु त्याच वेळी त्याने माझ्या मुलीला धमकावणाऱ्या तुमच्या समर्थकांना कशाप्रकारे तोंड द्यावं हे देखील आम्हाला सांगा असाही टोलाही त्याने मोदींना लगावला आहे. मोदींच्या विजयानंतर अनुरागच्या मुलीला ट्विटवरुन एका मोदी समर्थकाने अश्लील भाषेत थेट बलात्काराची धमकी दिली आहे. याच ट्विटचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत अनुरागने मोदींना सवाल केला आहे.
अनुरागने शेअर केलेल्या स्क्रीनशॉर्टमध्ये चौकीदार रामसिंघ नावाच्या ट्विटर अकाऊण्टवरुन करण्यात आलेले अत्यंत खालच्या थरातील अश्लील भाषेतील ट्विट दिसत आहे. यामध्ये तुझ्या बापाला शांत रहायला सांग अशी धमकी अनुरागच्या मुलीचा फोटो शेअर करत या व्यक्तीने दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये अनुराग म्हणतो, ‘प्रिय, नरेंद्र मोदी सर, निवडणुकीतील विजयासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन. सर्वसमावेश विकासाचा मुद्दा आपल्या भाषणातून मांडल्याबद्दल धन्यवाद. तुमच्यात आणि माझ्यात मतभेद असल्याने तुमचे समर्थक माझ्या मुलीली अशाप्रकारे धमक्या देऊन विजयाचा आनंद साजरा करत आहेत. कृपया तुमच्या या अशा समर्थकांशी आम्ही कशाप्रकारे वागावे हे ही देखील आता तुम्हीच आम्हाला सांगा’, असं प्रतिप्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं