भीषण! मोदींकडून विरोधकांच्या 'INDIA' शब्दाची तुलना थेट दहशतवादी संघटनेशी, ज्या देशाचे पंतप्रधान त्याच देशाच्या नावावरून केली जहरी टीका

INDIA Vs NDA | विरोधकांच्या आघाडीने सध्या मोदी बरेच चलबिचल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच त्यांची प्रत्येक टिपणी त्यांच्या अंगलट येऊन अडचणीत अधिक भर घालत आहे असं राजकीय तज्ज्ञ सांगत असताना आता मोदींनी पुन्हा तसंच काहीसं केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत विरोधकांवर जोरदार टीका केली. गेल्या 4 दिवसांपासून सभागृहात सुरू असलेल्या सततच्या गदारोळाबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, असा दिशाहीन विरोधी पक्ष मी कधीच पाहिला नाही. “हे लोक गोंधळलेले आहेत आणि काय करावे हे ठरवू शकत नाहीत. इतकंच नाही तर त्यांच्या वागण्यावरून असं वाटतं की, या लोकांना अनेक दशके सत्तेत यायचं नाही. पंतप्रधान म्हणाले की, विरोधक विखुरलेले आणि निराश आहेत. विरोधी महाआघाडीचे ‘INDIA’ असे नामकरण करण्यावरही त्यांनी निशाणा साधला आणि स्वतःच्या अडचणी वाढवून घेतल्याचं म्हटलं जातंय.
इंडियन मुजाहिद्दीन आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी तुलना
पंतप्रधान मोदी म्हणाले की, इंडिया’ला नावात जोडून कोणीही भारतीय होत नाही. मोदी यावेळी इतके घसरले ज्या देशाचे पंतप्रधान त्याच देशाच्या नावाची तुलना यावेळी त्यांनी इंडियन मुजाहिद्दीन आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या दहशतवादी संघटनेशी केल्याने मोठा गदारोळ होणार असे संकेत मिळत आहेत. मोदी पुढे म्हणाले की, “इंडियन मुजाहिद्दीन आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या नावानेही भारत होता. मात्र विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना साताच्याच सरकारमधील ‘स्टार्टअप इंडिया’ ‘डिजिटल इंडिया’ अशा योजनांचा देखील विसर पडल्याचं पाहायला मिळालं.
तसेच मणिपूरबाबत संसदेत निवेदन करण्याच्या विरोधकांच्या मागणीपुढे ते झुकणार नाहीत, हे पंतप्रधानांच्या भूमिकेवरून स्पष्ट होते. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, आमच्या मागणीत गैर काय आहे? एवढ्या मोठ्या घटनेनंतरही पंतप्रधान मोदी मणिपूरवर केवळ ३६ सेकंद बोलले आणि पंतप्रधानांनी मौन तोडल्यामुळे प्रसारमाध्यमांची मोठी धावपळ झाली असं त्या म्हणाल्या.
पीएम मोदी यांनी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया असा उल्लेखही केला
यावेळी पंतप्रधान मोदींनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचं नावही घेतलं. या संघटनेचे नावही भारत च असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, भारतातील विरोधी पक्षांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू केली आहे. टीएमसीच्या एका खासदाराने हा दावा केला आहे. लोकसभेत अविश्वास ठराव मांडला जातो आणि अशा प्रस्तावात सरकार पराभूत झाल्यास पंतप्रधानांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. लोकसभेत भाजपकडे स्वबळावर मोठे बहुमत आहे. त्याचबरोबर एनडीएला जोडल्यास सरकारकडे 350 पेक्षा जास्त जागा आहेत.
2024 मध्ये आम्ही पुन्हा सत्तेत येत आहोत
बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद म्हणाले की, आम्हाला आमच्या पंतप्रधानांचा अभिमान आहे. 2024 मध्ये आम्ही पुन्हा सत्तेत येत आहोत. पंतप्रधान म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना परदेशी नागरिकांनी केली. आज लोक इंडियन मुजाहिद्दीन आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारखी नावे वापरतात पण हे चेहरे काही तरी दाखवतात आणि सत्य काही दुसरंच असतं असं ते म्हणाले.
News Title : PM Narendra Modi made controversial statement on oppositions alliance word INDIA check details 25 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं