Paytm Share Price | पेटीएम शेअर्स तेजीत येणार? तज्ज्ञांनी पेटीएम शेअरची टार्गेट प्राईस जाहीर केली, डिटेल्स जाणून घ्या

Paytm Share Price | वन 97 कम्युनिकेशन्स म्हणजेच पेटीएम कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह 808 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तथापि, शेअर बाजारातील अनेक ब्रोकरेज फर्म पेटीएम कंपनीच्या स्टॉकबाबत बुलिश असून त्यांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
ब्रोकरेज फर्म CLSA ने पेटीएम स्टॉकवर 1,050 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पेटीएम कंपनीचा IPO 2021 साली शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. IPO मध्ये पेटीएम शेअरची किंमत 2150 रुपये होती. आपल्या IPO किमतीच्या तुलनेत पेटीएम स्टॉक 62 टक्के कमजोर झाला आहे. आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के घसरणीसह 780.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज फर्मचे मत :
CLSA फर्मने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, जून 2023 तिमाहीत पेटीएम कंपनीच्या भौतिक मूल्यात सातत्यपूर्ण वाढ पाहायला मिळाली आहे. पेटीएम कंपनीचा ETI (ESOP वगळता) अंदाजापेक्षा अधिक नोंदवला गेला आहे. Goldman Sachs फर्मच्या मते पेटीएम कंपनी आर्थिक वर्ष 2025-26 नंतर भारतातील सर्वात फायदेशीर इंटरनेट कंपनी म्हणून नावारूपाला येईल.
या सर्व बाबींचा विचार करून तज्ञांनी पेटीएम स्टॉकवर 1,200 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. काही तज्ञांनी पेटीएम कंपनीच्या कर्ज वितरण दरात घट झाल्याबद्दल चिंता देखील व्यक्त केली होती. जून 2023 तिमाहीत कंपनीचे कर्ज वितरण प्रमाण 3.8 टक्के वाढून घसरून 3.5 टक्क्यांवर आले आहेत. BofA सिक्युरिटीज फर्मने पेटीएम कंपनीच्या स्टॉकवर 1,020 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
जून 2023 तिमाहीची कामगिरी :
वन 97 कम्युनिकेशन्स ही पेटीएमची मूळ कंपनी मुख्यतः डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म चालवते. एप्रिल-जून 2023 तिमाहीत पेटीएम कंपनीच्या तिमाही तोटा 358.4 कोटी रुपयेपर्यंत खाली आला आहे. वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या ऑपरेटिंग उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तिमाही तोट्यात झपाट्याने घट नोंदवली गेली आहे.
जून 2023 तिमाहीत वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीच्या परिचालन उत्पन्नात 39.4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, कंपनीने 2,341.6 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीत वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे परिचालन उत्पन्न 1,679.6 कोटी रुपये नोंदवले गेले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Paytm Share Price today on 26 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं