'PM नरेंद्र मोदी' सिनेमाकडे भक्तांसहित प्रेक्षकांची पाठ; कार्टून सिनेमाची कमाई पण अधिक

मुंबई : भारताच्या राजकीय इतिहासात बहुमताने निवडून येणारे मोदींना त्याच्या जीवनपटावर आधारित सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक अल्पमतात देखील हजेरी लावताना दिसत नाही. देशाची सत्ता पुन्हा एकदा मिळवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपटाकडं सिनेरसिकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटानं केवळ २.२५ ते २.५० कोटींची कमाई केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधीच तयार असलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट आचारसंहितेच्या कचाट्यात अडकला होता. अखेर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. भारतीय जनता पक्षाला मिळालेलं बहुमत व देशात सध्या सुरू असलेला ‘मोदी, मोदी’चा गजर पाहता मोदींवरील चित्रपटाला तुडुंब प्रतिसाद मिळेल, असा सिनेक्षेत्रातील जाणकारांचा अंदाज होता. मात्र, तो फोल ठरला आहे.
बॉक्स ऑफिस इंडिया.कॉमच्या अहवालानुसार पहिल्या दिवशी या चित्रपटानं सुमारे केवळ २.५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाबरोबर प्रदर्शित झालेला अर्जुन कपूरचा ‘इंडियाज मोस्ट वाँटेड’ हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. कमाईच्या बाबतीत, हा चित्रपट ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या मागे आहे. हॉलिवूडच्या ‘अलादीन’ चित्रपटाच्या स्पर्धेलाही या दोन्ही चित्रपटांना तोंड द्यावं लागत आहे. ‘अलादीन’नं पहिल्याच दिवशी चार कोटींहून अधिक कमाई केली आहे.
‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात नरेंद्र मोदी यांचा गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान हा प्रवास दाखवण्यात आला आहे. मोदींच्या शालेय जीवनापासून पंतप्रधानपदाचा कालखंड यात आहे. चित्रपटाची सुरुवात २०१३मधील भाजपच्या बैठकीत मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्याच्या प्रसंगापासून होते. यानतंर फ्लॅशबॅकमध्ये मोदींचं पूर्वायुष्य दाखवलं गेलं आहे. उमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात विवेक ओबेरॉय यानं मोदींची भूमिका साकारली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं