Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर खरेदी करावा? तज्ज्ञांचे शेअरबाबत मत काय? टाटा पॉवर शेअर मल्टिबॅगर परताव्याच्या दिशेने सुसाट?

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी कमलीची तेजी पाहायला मिळाली होती. टाटा पॉवर स्टॉक 3 टक्क्यांच्या वाढीसह 243.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील तीन दिवसात टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढले आहेत. तर आज टाटा पॉवर स्टॉकमध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 11.36 टक्के नफा कमावून दिला आहे.
टाटा पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 251 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 182.45 रुपये होती. आज बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 3.52 टक्के घसरणीसह 235.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
प्रसिद्ध रेटिंग एजन्सी ICRA आणि केअर रेटिंग्स फर्मने टाटा पॉवर कंपनी सकारात्मक रेटिंग दिली आहे. मार्च 2023 तिमाहीनंतर टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 23 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 28 मार्च 2023 या कंपनीचे शेअर्स 183.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 3.5 महिन्यांत टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 23.36 टक्के मजबूत झाले आहेत. Tips 2 Trades फर्मच्या मते टाटा पॉवर स्टॉकमध्ये 230 रुपये किमती जवळ मजबूत रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढील काळात हा शेअर 204 रुपये पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
टाटा पॉवर कंपनीने आता हरित ऊर्जेच्या विकास कामावर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीचे ऑर्डर बुक्स देखील मजबूत झाले असून स्टॉकमध्ये याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. पुढील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 370 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र तज्ञांनी गुंतवणूक करताना 197 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
टाटा पॉवर ही कंपनी भारतातील वीज निर्मिती, वितरण आणि प्रसारण क्षेत्रात व्यवसाय करणारी सर्वात मोठी कंपनी मानली जाते. टाटा पॉवर कंपनीची वीज निर्मिती क्षमता सध्या 14,230 मेगावॅट आहे. कंपनीची थर्मल पॉवर निर्मिती क्षम्य 8,860 मेगावॅट आहे. तर हायड्रो पॉवर क्षमता 880 मेगावॅट आहे. पवन ऊर्जा निर्मिती क्षमता 941 मेगावॅट आहे. तर सौर ऊर्जा निर्मिती क्षमता 3,106 मेगावॅट आहे. टाटा पॉवर कंपनी कचऱ्यापासून देखील 443 मेगावॅट वीज निर्माण करते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 77,726.63 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Power Share Price today on 02 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं