गावं-शहरांतील चौकांमध्ये गप्पा रंगल्या 'यांना मतं नक्की दिली तरी कोणी?'

मुंबई : देशभरात रोजगार आणि महागाईसारख्या प्रमुख विषयांवरून भाजप आणि मोदी विरोधी वातावरण असताना स्वतः भाजप देखील बहुमताने सत्तेत येईल का या भीतीने ग्रासली होती. समाज माध्यमांवर मोदी किंवा भाजप संबंधित येणाऱ्या बातम्यांवर नेटिझन्स देखील तुफान टीकेची झोड उठवताना दिसत होते. त्या प्रतिकऱ्यांमध्ये भाजप किंवा मोदींच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया शोधून देखील सापडणं कठीण होतं. मात्र मोदी लाट तर सोडा, प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी मोदी त्सुनामी आली अनेकजण बुचकळ्यात पडल्याचे चित्र आहे.
भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर भाजप सार्थकांनी जल्लोष केला हे समजण्यासारखं असलं तरी सामान्य मतदार मात्र सर्वकाही शांतपणे पाहात असल्याचं प्रकर्षाने जाणवत होते. त्यात मोदींच्या विदेश दौऱ्यात तेथे मोठं मोठे इव्हेन्ट करणारे त्यांचे समर्थक (विशेष करून गुजराती आणि जैन समाजातील) देखील या विजयानंतर साहजिकच उत्सव साजरा केला. मात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना पण या निकालापासून संपूर्ण देशात एक प्रकारची गूढ शांतता पसरल्याचे नजरेस पडत आहे. त्यामुळे शहर आणि गावातील रस्त्यांवर, गल्लीबोळात, चौकात, शिवारात, पारा खाली कुठेही उत्साह नाही आणि उन्मादही नाही. निकाल लागला आणि उमेदवारांच्या विजयी मिरवणुकांनंतर कार्यकर्ते देखील लगेच गाशा गुंडाळून शांत झाले. त्यात सामान्य मतदार अजिबात निकालाची चर्चा करताना दिसला नाही.
विशेष म्हणे मोदींच्या विजया त्सुनामी आली अचानक देश जणू मौन अवस्थेत गेला हे अचंबित करणारं आहे.कारण त्याच मूळ कारण म्हणजे या अचंबित करणाऱ्या निकालानंतर प्रत्यक्ष मतदाराला देखील धक्का बसला आहे. ‘भाजपा सत्तेवर येणार, पण कमी जागा मिळतील’ या मानसिकतेत सर्व होते. त्यामुळे भाजपाला एकदम ३५० सीट मिळाल्याचे पाहून सर्वांचाच मानसिक गोंधळ उडाला आहे. २०१४ ची मोदी लाट सर्वांना दिसली होती, जाणवली होती. त्यामुळे २०१४ सालचा निकाल सर्वांना अपेक्षित होता. पण यावेळी मोदी लाट कुणालाही दिसली नव्हती आणि जाणवली नव्हती, तसेच कपोकल्पित त्सुनामीचे साधे बुडबुडे देखील मतदाराला पाहायला मिळाले नव्हते.
विशेष म्हणजे सुप्त लाटेचे संकेत केवळ मोदी आणि अमित शहाच त्यांच्या पत्रकार परिषदेत आणि भाषणात देत आत्मविश्वासाने देत होते. आणि चमत्कारीत निकाल जनतेला पाहायला मिळाला आणि गाव शहरातील प्रत्येक चौकात आता ३-४ दिवस उलटल्यावर ‘हे कसं शक्य आहे?’ आणि यांना नक्की मतं दिली तरी कोणी अशी दबक्या आवाजात चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. या निकालाचे नक्की विश्लेषण काय करायचे हे सामान्य माणसाला कळत नाही आणि तज्ज्ञांनाही जमत नाही अशी स्थिती आहे. पुढील ५ वर्षे जे घडेल ते पाहायचे आणि सोसायचे एवढंच आमच्या हातात आहे असं ते हताशपणे गप्पा मारताना बोलत आहेत, तर त्यात प्रसार माध्यमांविषयी देखील चीड पाहायला मिळत आहे हे विशेष.
बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, ढासळलेली आर्थिक स्थिती हे मूळ मुद्दे यावेळी प्रचारातच नव्हते. केवळ राष्ट्रवाद आणि हिंदुत्त्वाला पूर्ण महत्त्व देऊन भरभरून मतदान केले का हा प्रश्न आहे. वास्तविक पुढची ५ वर्ष भीषण असणार आहेत हे वास्तव आहे, त्यात तुम्ही महागाई आणि बेरोजगारीवर प्रश्न विचारण्याचा अधिकार देखील गमावला आहे हे स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही असे हे निकाल आहेत. अच्छे दिन’च्या नादात २०१४ मधील निवडणुकीत केलेली चूक देशाला पुढील २५-३० वर्ष त्रास देईल हे निश्चित आहे. कारण EVMच्या मोहजालात लोकशाहीच गुरपटली आहे, त्यामुळे मतदार राजाने सरकारच्या बाजूने किंवा विरोधात मतदान केलं तरी काहीच फरक पडणार नाही हे या निवडणुकीच्या निकालातून अधीरेखित झालं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं