Zomato Share Price | झोमॅटो कंपनी नफ्यात, शेअरने एका दिवसात 14 टक्के परतावा दिला, झोमॅटो शेअरची पुढची टार्गेट प्राईस पहा

Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. झोमॅटो कंपनीचे शेअर्स शुक्रवारी तुफानी तेजीत धावत होते. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढीसह 98.39 रुपये किमतीवर पोहचले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 86.22 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 10.17 टक्के वाढीसह 95.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअर्समध्ये अचानक तेजी येण्याचे कारण म्हणजे कंपनीने पहिल्यांदाच नफा कमावला आहे. अनेक तिमाहीपासून झोमॅटो कंपनी सतत तोट्यात व्यवसाय करत होती.
जून तिमाही कामगिरी :
झोमॅटो कंपनीने शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून पहिल्यांदा नफा कमावला आहे. जून 2023 तिमाहीत झोमॅटो कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 71 टक्के वाढ नोंदवली आहे. त्यामुळे कंपनीला जबरदस्त नफा झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत झोमॅटो कंपनीने 2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एप्रिल-जून 2023 तिमाहीत झोमॅटो कंपनीने 70.9 टक्के वाढीसह 2416 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी जून 2022 तिमाहीत झोमॅटो कंपनीला 186 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. आणि त्या तिमाहीत कंपनीने 1414 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
लक्ष किंमत : शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मात्र झोमॅटो कंपनीचे शेअर्स पुढील काळात 130 रुपयेपर्यंत वाढू शकतात. परकीय ब्रोकरेज फर्म जेफरीजने देखील झोमॅटो कंपनीच्या स्टॉकवर 130 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शिअलच्या तज्ञांच्या झोमॅटो स्टॉक सध्या गुंतवणुकीसाठी आकर्षक किमतीवर ट्रेड करत आहे.
ब्रोकरेज हाऊसने झोमॅटो स्टॉकवर 115 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. मार्च 2023 तिमाही निकालानंतर झोमॅटो कंपनीचे शेअर्स तब्बल 35 टक्के मजबूत झाले आहेत. ब्रोकरेज हाऊस नुवामाने झोमॅटो स्टॉकवर 110 रुपये ही अल्पकालीन लक्ष किंमत म्हणून जाहीर केली आहे. मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीज फर्मने बाय रेटिंगसह झोमॅटो कंपनीचे शेअर्स 110 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Zomato Share Price today on 05 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं