मोदींचा चमत्कारी विजय ही भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत चिंतेची बाब: द वॉशिंग्टन पोस्ट

वाशिंग्टन डीसी: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात मोदी लाट नसताना देखील प्रत्यक्षात मोदी त्सुनामी आली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मोदींच्या या यशानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं तसेच लोकांमध्ये सुद्धा आता २-३ दिवसानंतर वेगळीच चर्चा चौकाचौकात रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने या संदर्भात एक लेख प्रसिद्ध केला आहे. भारतासारख्या विशाल लोकशाहीत मोदींचा आश्चर्यकारक विजय अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे.
या लेखात चिंता व्यक्त करताना म्हटलं आहे की, ‘या मोठ्या बहुमताला मोदी सरकार आता आर्थिक सुधारणांपेक्षा, लोकांनी हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्याला बहुमत दिल्याचा समज करून घेईल. त्यात जगावर नियंत्रण ठेवणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुद्धा भारतासोबत आर्थिक हितसंबंध प्रस्तापित करण्यावर अधिक जोर आहेत आणि त्यामुळे ते सध्या मोदींची स्तुती करण्यात मग्न आहेत. परिणामी ते देखील स्वतःच्या हितसंबंधापायी भारतातील अशा महत्वाच्या विषयांवर शांत राहणं पसंत करतील’ अशी चिंता वॉशिंग्टन पोस्टने लेखात व्यक्त केली आहे.
तसेच यात पुढे सांगण्यात आला आहे की, ‘२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मोदी आर्थिक सुधारणा आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन या प्रमुख मुद्यांवर सत्तेत आलं होतं. मात्र निकाट्याच पार पडलेल्या निवडणुकीतील प्रचारात मोदींचे प्रचारातील मुद्दे अत्यंत वेगळेच होते, ज्यामध्ये आर्थिक सुधारणा, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाई या लोकांशी निगडित प्रमुख मुद्यांना जराही महत्व देण्यात आले नाही. कारण यावेळी मोदी केवळ राष्ट्रवाद आणि जातीयवादाच्या मुद्यावर प्रचार करत होते.
यावेळी त्यांनी प्रचारात पाकिस्तानला अणुबॉम्बच्या टाकण्याच्या धमक्या देऊन मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. तसेच भारतीय वायुदलाने बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यात नक्की दहशदवादी तळ उद्धवस्त झाले होते का? यांचा कोणताही पुरावा शेवटपर्यंत दिला नाही, मात्र त्याआधारेच त्यांनी राष्ट्रवादाच्या नावाने मतदारांकडून मतं मागितली, असे मुद्दे लेखात नमूद करून मोदींच्या हेतूबदद्दलच अप्रत्यक्ष संशय व्यक्त केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं