Orchid Pharma Share Price | ऑर्किड फार्मा शेअरने फक्त 3 वर्षात 2600 टक्के परतावा दिला, शेअर्स डिटेल्स पाहून खरेदीचा विचार करा

Orchid Pharma Share Price | ऑर्किड फार्मा या फार्मा क्षेत्रातील कंपनीने अवघ्या 3 वर्षांत शेअर धारकांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. मागील तीन वर्षात ऑर्किड फार्मा कंपनीचे शेअर्स 2,600 टक्के वाढले आहेत. या कालावधीत शेअर्सची किंमत 21 रुपयेवरून वाढून 567 रुपयेवर पोहचली आहे. (Orchid Share Price)
ऑर्किड फार्मा कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर 0.88 टक्क्यांच्या घसरणीसह 567.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी ऑर्किड फार्मा कंपनीचे शेअर्स 1.88 टक्के वाढीसह 584.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
तीन वर्षाचा परतावा :
3 वर्षांपूर्वी म्हणजेच 6 नोव्हेंबर 2020 रोजी ऑर्किड फार्मा कंपनीचे शेअर्स 20.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 567.55 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2,624.68 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी ऑर्किड फार्मा कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2,624 टक्के वाढीसह 27.24 लाख रुपये झाले असते. अवघ्या 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत ऑर्किड फार्मा स्टॉकने लोकांना 26 लाख रुपये निव्वळ नफा कमावून दिला आहे.
ऑर्किड फार्मा स्टॉक कामगिरी :
मागील एका महिन्यात ऑर्किड फार्मा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15.13 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 49.84 टक्के नफा कमावून दिला आहे. या मागील एका वर्षात ऑर्किड फार्मा कंपनीच्या शेअरने लोकांना 85.43 टक्के प्रॉफिट मिळवून दिला आहे.
ऑर्किड फार्मा कंपनीने जून 2023 मध्ये इक्विटी शेअर्सच्या क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटच्या माध्यमातून काही संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 400 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. ऑर्किड फार्मा कंपनीने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोसायटी जनरल, क्वांट म्युच्युअल फंड, कार्नेलियन स्ट्रक्चरल शिफ्ट फंड, 238 प्लॅन असोसिएट्स यासारख्या दिग्गज संस्थांना 403.93 रुपये प्रति शेअर किमतीवर 9,902,705 शेअर्स विकले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Orchid Pharma Share Price today on 07 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं