Cello World IPO | कमाईसाठी पैसे तयार ठेवा! सेलो पेन बनवणाऱ्या कंपनीचा IPO लाँच होतोय, फायदा घेण्यासाठी तपशील जाणून घ्या

Cello World IPO | तुम्ही लहानपणी शाळेत असताना, तुमचा आवडता पेन कोणता होता? असा जर प्रश्न केला तर बहुतेक लोक म्हणतील, सेलो पेन. सेलो पेन सोबत आपल्या बऱ्याच आठवणी जुळलेल्या आहेत. आता सेलो पेन बनवणारी सेलो वर्ल्ड लिमिटेड ही मुंबई स्थित कंपनी आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीने IPO द्वारे भांडवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सेलो वर्ल्ड लिमिटेड नुकताच सेबीकडे DRHP कागदपत्रे दाखल केले आहेत. सेबी पुढील काही दिवसात या कंपनीच्या आयपीओवर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
IPO तपशील:
सेलो वर्ल्ड लिमिटेड या कंपनीच्या IPO चे स्वरूप ऑफर फॉर सेल असेल. कंपनीचे प्रवर्तक आयपीओद्वारे 1750 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत. सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीने दाखल केलेल्या DRHP कागदपत्रांनुसार कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी IPO मध्ये 10 कोटी शेअर्सचा कोटा राखीव ठेवला जाणार आहे.
IPO चे इतर तपशील :
सेलो वर्ल्ड लिमिटेड ही कंपनी ऑफर फॉर सेल अंतर्गत आपला IPO लाँच करणार आहे. सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तक गटातील प्रदीप राठोड 300 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत. पंकज राठोड 670 कोटी मूल्याचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकणार आहेत. तर गौरव राठोड 380 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकणार आहेत.
यासह संगीता राठोड आपले 200 कोटी मूल्याचे शेअर्स विकणार आहेत, तर बबिता पंकज राठोड आपले 100 कोटी मूल्याचे शेअर्स विकणार आहेत. रुची गौरव राठोड देखील आपले 100 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहेत.
सेलो वर्ल्ड लिमिटेड या कंपनीने आपल्या IPO मध्ये पात्र संस्थागत खरेदीदारांसाठी 50 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. तर.गैरसंस्थात्मक खरेदीदारांसाठी कंपनीने 15 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कंपनीने 35 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 32 टक्के वाढीसह 1796.69 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Cello World IPO is ready to launch 18 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं