Garden Reach Share Price | दिल गार्डन-गार्डन झालं रं! गार्डन रीच शिपबिल्डर्स शेअरने 3 दिवसात 40 टक्के परतावा दिला, तुम्ही फायदा घेणार?

Garden Reach Share Price | गार्डन रीच शिपबिल्डर्स आणि कोचीन शिपयार्ड या दोन सरकारी मालकीच्या संरक्षण कंपन्यांचे शेअर्स कमालीची कामगिरी करत आहेत. यापैकी गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स मागील 3 दिवसांत 40 टक्क्यांहून अधिक वाढले होते. तर कोचीन शिपयार्ड कंपनीचे शेअर्स देखील तीन दिवसात 30 टक्के पेक्षा जास्त वाढले आहेत.
या दोन्ही कंपन्यांनी आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले. आणि कंपन्यांची तिमाही कामगिरी सकारात्मक असल्याने गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीला सुरुवात केली. आज शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स 4.19 टक्के घसरणीसह 747.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर कोचीन शिपयार्ड कंपनीचे शेअर्स 3.43 टक्के घसरणीसह 845.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीने निव्वळ नफ्यात तब्बल 54 टक्के वाढ नोंदवली आहे. त्याचवेळी कोचीन शिपयार्ड कंपनीने देखील जून 2023 च्या तिमाहीत निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ नोंदवली आहे. गार्डन रीच कंपनीचे शेअर्स मागील 3 दिवसात 42 टक्के वाढले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गार्डन रीच कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 832.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
गार्डन रीच ही कंपनी मुख्यतः युद्धनौका बनवण्याचे काम करते. या कंपनीने 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत 77 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत गार्डन रीच कंपनीच्या नफ्यात 54 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीने मागील वर्षी जून 2022 तिमाहीत 50 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
कोचीन शिपयार्ड कंपनीचे शेअर्स मागील 3 दिवसात 40 टक्के वाढले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कोचीन शिपयार्ड कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढीसह 904.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 923.00 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 329.10 रुपये होती.
चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कोचीन शिपयार्ड कंपनीने निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ नोंदवली आहे. जून 2023 च्या तिमाहीत या कंपनीने 98.65 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर मागील वर्षी जून तिमाहीत या कंपनीने 42.18 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Garden Reach Share Price today on 18 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं