Multibagger Stocks | एक वर्षात मालामाल करणारे 2 मल्टिबॅगर शेअर्स नोट करा, फक्त 1 वर्षात 1 लाखावर देतं आहेत 16 लाख रुपये परतावा

Multibagger Stocks | शेअर बाजारात कधी कधी पेनी स्टॉक्स गुंतवणुकदारांना असा काही परतावा देऊन जातात, जे त्यांचे पूर्ण आयुष्य बदलून टाकते. आज या लेखात आपण अशा 2 स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे. या दोन स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 16 लाख रुपये परतावा दिला आहे. यातील पहिल्या कंपनीचे नाव आहे, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज आणि दुसऱ्या कंपनीचे नाव आंध्र सिमेंट आहे.
एक वर्षभरापूर्वी आंध्र सिमेंट कंपनीचे शेअर्स 6.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 106.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1551 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 158.25 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1.45 रुपये होती.
मागील एका महिन्यात आंध्र सिमेंट कंपनीच्या शेअरने लोकांना 30.52 टक्के अधिक नफा कमावून दिला आहे. या कंपनीमध्ये प्रमोटर्सने 95 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 0.01 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी आंध्र सिमेंट कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के वाढीसह 105.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1500 टक्के पेक्षा अधिक नफा देणाऱ्या स्टॉकमध्ये स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज कंपनीचे नाव देखील सामील आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1583.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. एक वर्षभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 62.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये या कंपनीचे शेअर्स 1010 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1527.10 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1010 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 62.75 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल कंपनीचे शेअर्स 1000 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks for investment on 22 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं