भ्रष्टाचाराचे आरोपा असलेले कृपाशंकर सिंह यांना भाजपात पावन करून घेण्याच्या हालचाली

मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने पुन्हा दलबद्दल सुरु होण्याची शक्यता आहे. त्यात सर्वाधिक भरणा हा भाजपला देण्यात येईल असं म्हटलं जातं आहे. मात्र यामध्ये इतर पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले नेतेमंडळी अधिक असतील असं म्हटलं जात आहे. भाजप कितीही म्हणत असेल की आम्ही भ्रष्टाचाराला थारा देत नाही, पण वास्तविक इतर पक्षातील असेच भ्रष्ट नेते भाजपमध्ये आणून त्यांना पावन करून घेण्याची सुरुवात होणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
त्याचाच एक प्रत्यय म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकर सिंग यांच्या घरी गणपती दर्शनाला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. मात्र आता विधानसभा निवडणूक जवळ येताच त्यांनी भाजपच्या इतर नेते मंडळींच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. काल कृपाशंकर सिंग यांनी भाजपचे विधानसभेचे आमदार यांची देखील भेट घेतली.
दरम्यान कृपाशंकर सिंग यांच्यावर आधीच बेहिशेब संपत्तीवरून राज्य सरकारकडून चौकशी सुरु आहे. त्यात गृहखातं मुख्यमंत्र्यांकडे असल्याने सर्वच शक्यता कृपाशंकर सिंग यांनी चाचपडल्या असाव्यात. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करून स्वतःला पावन करून घेण्यासाठी ते धडपडत आहेत. त्यात भाजप शिवसेनेला अंधारात ठेवून त्यांच्या विरुद्ध विधानसभेची व्यूहरचना देखील आखात आहेत असं समजतं. त्याचाच प्रत्यय म्हणजे मुंबईतील कलिना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय पोतनीस यांच्या विरुद्धची व्यूहरचना असल्याचं वृत्त आहे, ज्याची तयारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुरु केली होती. दरम्यान, सेनेच्या हमखास निवडून येणाऱ्या जागांवर अशाच पावन करून घेतलेल्या उमेदवारांना उभं केलं जाईल, अशी शक्यता आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं