Trident Share Price | ट्रायडेंट शेअरसहित टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, टार्गेट प्राईस पहा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

Trident Share Price | मागील संपूर्ण आठवड्यात मिडकॅप स्टॉक्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NIFTY मिडकॅप-100 ने नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती. शेअर बाजारातील तज्ञांनी असे काही स्टॉक निवडले आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही भरघोस कमाई करू शकतात. आज या लेखात आपण शेअरखान फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवडलेले टॉप 3 स्टॉक पाहणार आहोत. तुम्ही या शेअर्समध्ये दीर्घकालीन, अल्पकालीन आणि मध्यम मुदतीसाठी पैसे लावू शकता.
ट्रायडेंट
शेअर बाजारातील या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 8.3 टक्क्यांच्या वाढीसह 39.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी या स्टॉकवर 55 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. यासह तज्ञांनी 33.30 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 22.6 टक्के वाढली आहे. तर मागील तीन महिन्यांत हा स्टॉक 23 टक्के वाढला आहे. सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.39 टक्के वाढीसह 40.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (०५ सप्टेंबर : सकाळी) सुद्धा ट्रायडेंट शेअर 8.49 टक्के (NSE) तेजीसह 43.45 रुपयांवर ट्रेड करत आहे.
NBCC
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी दीर्घ मुदतीसाठी, पहिले लक्ष्य 90 रुपये आणि दुसरे लक्ष्य 115 रुपये जाहीर केले आहे. आणि गुंतवणूक करताना 41 रुपयेवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी दिलेली लक्ष्य किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 115 टक्के अधिक आहे. मागील एका आठवड्यात या स्टॉकची किंमत 7.4 टक्के वाढली होती. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या स्टॉकने 22 टक्के आणि सहा महिन्यात 36 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 55 टक्के वाढली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 52.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.82 टक्के वाढीसह 56.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
इमामी
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 536 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 473 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 675 रुपये लक्ष किमतीसाठी गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या पातळीच्या तुलनेत 25 टक्के अधिक आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 4.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील तीन महिन्यात हा कंपनीच्या शेअरने 38 टक्के नफा दिला. तर 2023 या वर्षात गुंतवणूकदारांनी 26 टक्के नफा कमावला आहे. आज सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.24 टक्के घसरणीसह 523.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Trident Share Price Stocks To Buy 05 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं