L&T Share Price | भरवशाचा शेअर! लार्सन अँड टुब्रो कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली, 2 दिवसात शेअर 7 टक्के वाढला, फायदा घेणार?

L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो लिमिटेड या अभियांत्रिकी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच कंपनीने सौदी अरामको कंपनी कडून एक मोठी ऑर्डर मिळाल्याची बातमी जाहीर केल्याने स्टॉक मध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 124.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.02 टक्के वाढीसह 2,903.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
7 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आलेल्या एका मीडिया रिपोर्टनुसार लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीला सौदी अरामको कंपनीच्या जाफुराह अपारंपरिक गॅस उत्पादन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन अभियांत्रिकी कामे, काही उपकरण खरेदी आणि बांधकाम संबंधित कमी देण्यात आले आहेत. सौदी अरामको कंपनीने लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीला जाफुराह अपारंपरिक गॅस निर्मिती प्रकल्पासाठी जी ऑर्डर दिली आहे, त्याचे एकूण मुल्य 24,000 कोटी रुपये आहे.
लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीला आणखी एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. यात कंपनीला कॉम्प्रेस्ड गॅस कॉम्प्रेशनच्या निर्मितीचे काम देण्यात आले आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 1 अब्ज डॉलर्स असेल. या ऑर्डर मध्ये कंपनीला गॅस प्रोसेसिंग प्लांट आणि मुख्य प्रक्रिया युनिट विकसित करायचे आहे.
सौदी आरामको पूर्व प्रांतात 110 अब्ज डॉलर्सचा जाफुराह गॅस प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे. लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीने आता 1,000 ते 2,500 कोटी रुपये श्रेणीतील प्रकल्पांना मध्यम महत्त्वाचे ऑर्डर म्हणून वर्गीकृत केले आहे. आणि 2,500 ते 5,000 कोटी रुपये श्रेणीतील प्रकल्पांचे वर्गीकरण ‘मोठे ऑर्डर्स’ म्हणून केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | L&T Share Price today on 08 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं