Meson Valves India IPO | होय! अल्पावधीत मोठा परतावा मिळेल! IPO शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 88% परतावा देईल, GMP पहा

Meson Valves India IPO | मेसन वाल्व इंडिया कंपनीचा IPO आज 8 सप्टेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO 12 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. मेसन वाल्व इंडिया कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 31.09 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे.
या कंपनीच्या IPO ची इश्यू किंमत 102 रुपये जाहीर करण्यात आली आहे. मेसन वाल्व इंडिया कंपनी आपल्या IPO मध्ये 30.48 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. या IPO मध्ये कंपनीने मार्केट मेकर साठी 1.59 कोटी रुपयांचे 1.56 लाख शेअर्स राखीव देखील राखीव ठेवले आहेत.
मेसन वाल्व इंडिया कंपनीने आपल्या IPO मध्ये अर्धा भाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. आणि उर्वरित 50 टक्के कोटा उच्च निव्वळ मूल्य असलेल्या वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते मेसन वाल्व इंडिया कंपनीचा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 90 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.
तज्ज्ञांच्या मते जर ना स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 90 रुपये प्रीमियम किमतीवर टिकला, आणि शेअर अप्पर किंमत बँड वर करण्यात आले, तर शेअर लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणुकदारांना 88 टक्के नफा सहज देऊ शकतो.
मेसन वाल्व इंडिया IPO स्टॉकची इश्यू किंमत 102 रुपये जाहीर करण्यात आली आहे. एक लॉटमध्ये कंपनी 1,200 इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. त्यानुसार किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट मधील 1200 शेअर्स खरेदी करण्यासाठी 1,22,400 रुपये जमा करावे लागणार आहे. उच्च नेटवर्थ असलेले गुंतवणुकदार किमान गुंतवणूक किमान 2 लॉट खरेदी करू शकतात. यासाठी त्यांना किमान 2,44,800 रुपये जमा करावे लागणार आहे.
मेसन वाल्व इंडिया ही पुणे- स्थित कंपनी व्हॉल्व्ह सप्लायर्सचे काम करते. मेसन वाल्व इंडिया कंपनी आपल्या IPO मधून जमा होणारी रक्कम नवीन प्लांट बांधण्यासाठी खर्च करणार आहे. यामध्ये 11.37 कोटी रुपये मूल्याची यंत्रसामग्री आणि 11.95 कोटी रुपये खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी खर्च करणार आहे. उर्वरित रक्कम कंपनीद्वारे सामान्य कॉर्पोरेट उद्देशांवर खर्च केली जाणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Meson Valves India IPO for investment 08 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं