Salasar Techno Share Price | अल्पावधीत 490 टक्के परतावा देणारा सालासर टेक्नो शेअर तेजीत, शेअरची किंमत 58 रुपये

Salasar Techno Share Price | सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरने सोमवारी जबरदस्त तेजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यात सोमवारी सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर 4 टक्के वाढीसह 54.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारी या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक उसळी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे.
सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीमध्ये म्हंटले आहे की, रवांडा ट्रान्समिशन सिस्टम रीइन्फोर्समेंट आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टसाठी एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीद्वारे सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीला 75.23 कोटी रुपये म्हणजेच जवळपास 9.40 दशलक्ष डॉलर्स किमतीचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे.
आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 0.75 टक्के वाढीसह 53.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 58.66 रुपये होती.
मागील तीन वर्षांच्या कालावधीत सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 490 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 61.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही कंपनी 2017 पासून आपल्या शेअर धारकांना सतत लाभांश वाटप करत आहे.
सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीची स्थापना 2006 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः सानुकूलित स्टील उत्पादन आणि पायाभूत सुविधां संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. ही कंपनी अभियांत्रिकी, डिझाइनिंग आणि उत्पादन संबंधित सेवा देखील प्रदान करते.
या कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये टेलिकॉम टॉवर्स, ट्रान्समिशन लाइन टॉवर, स्मार्ट लाइटिंग पोल, युटिलिटी पोल, हाय मास्ट पोल, स्टेडियम लाइटिंग पोल, मोनोपोल, सबस्टेशन स्ट्रक्चर्स, सोलर मॉड्यूल माउंटिंग स्ट्रक्चर्स, रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन यांचा समावेश आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Salasar Techno Share Price today on 20 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं