Nykaa Share Price | भारत आणि कॅनडा वादाचा फटका नायका शेअर्सला, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? पुढे काय होणार?

Nykaa Share Price | मागील काही दिवसापासून भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांचे राजनैतिक संबंध फार खराब स्थितीत आले आहेत. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डाने भारतीय शेअर बाजारात ज्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, ते शेअर्स विकायला सुरुवात केली आहे.
कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डाने अनेक भारतीय स्टॉक मध्ये गुंतवणूक केली होती. त्यातच एक स्टॉक म्हणजे, नायका. आज शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी नायका स्टॉक 1.69 टक्के वाढीसह 144.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
नायका कंपनीची मूळ कंपनी असलेल्या FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावामुळे 3 टक्क्यांनी कमजोर झाले होते. दिवसा अखेर हा स्टॉक 2.45 टक्के घसरणीसह 145.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. नायका कंपनीचे एकूण बाजार भांडवल 41,536.09 कोटी रुपये आहे. कॅनेडियन पेन्शन फंड नायका कंपनीमधील अँकर गुंतवणूकदारांपैकी एक आहे. या कंपनीचा IPO 2021 मध्ये शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता.
त्यावेळी शेअरची इश्यू किंमत 1125 रुपये होती. ज्या वेळी नायका शेअर इंडेक्सवर लिस्ट झाला तेव्हा त्याची किंमत 2000 रुपये होती. नायका कंपनीमध्ये अँकर गुंतवणूकदार असलेल्या कॅनेडियन पेन्शन फंडने 30 जून 2023 पर्यंत नायका कंपनीचे 1.47 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. याचे एकूण मुल्य 625 कोटी रुपये आहे.
नुकताच नायका कंपनीच्या सीईओ फाल्गुनी नायर यांनी भाकीत केले होते, की भारत 2030 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ बनेल. यासह त्यांनी आपल्या व्यवसायाच्या वाढीव संभाव्यतेबद्दल उत्साह व्यक्त केला होता. नायका कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना, नायर म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्थे सारखा नायका कंपनीचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. भारतात सौंदर्य प्रसाधन, पर्सनल केअर यांचा दरडोई वापर वाढण्याची शक्यता मजबूत आहे.
सध्या भारतात दरडोई पर्सनल केअर खर्च 80 डॉलर्स प्रति व्यक्ती आहे. नायर म्हणाल्या की, फॅशनच्या बाबतीत भारतात दरडोई खर्च 54 डॉलर्स आहे. 2030 पर्यंत हा खर्च 160 डॉलर्स प्रति व्यक्ती पोहोचण्याची शक्यता आहे. नायका कंपनीने 2023 या वर्षाच्या अखेरीस आखाती देशातील प्रसिद्ध रिटेल व्यवसाय समूहाच्या सहकार्याने आपले पहिले आंतरराष्ट्रीय स्टोअर लाँच करण्याची घोषणा केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Nykaa Share Price today on 22 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं