LT Foods Vs Mishthann Share | एलटी फूड्स की मिष्ठान्न शेअर? कोणता शेअर मल्टिबॅगर? या स्टॉकने 3 वर्षात 495% परतावा दिला

LT Foods Vs Mishthann Share | एलटी फूड्स या कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात एलटी फूड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे.
मागील 3 वर्षांत या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 495 टक्के नफा कमावला आहे. गुंतवणूकदारांना एवढा जबरदस्त परतावा देऊन देखील एलटी फूड्स कंपनीच्या शेअरची किंमत तुलनेने खूप कमी आहे. आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी एलटी फूड्स स्टॉक 3.19 टक्के वाढीसह 163.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
शेअरची कामगिरी
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलटी फूड्स कंपनीचे शेअर्स 2.65 टक्क्यांच्या घसरणीसह 158.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी एलटी फूड्स स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 40 टक्के वाढले आहेत.
कंपनीबद्दल थोडक्यात
एलटी फूड्स ही FMCG क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः बासमती तांदूळ विक्री करणाऱ्या जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. एलटी फूड्स कंपनीचा ‘दावत’ नावाचा तांदूळ ब्रँड भारतात खूप प्रसिद्ध मानला जातो. तसेच या कंपनीचा ‘रॉयल’ नावाचा तांदूळ ब्रँड अमेरिकेत खूप प्रसिद्ध आहे.
एलटी फूड्स कंपनीच्या लेटेस्ट शेअर होल्डिंग डेटानुसार या कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 51 टक्के भाग भांडवल धारण केले आहे आणि उर्वरित 49 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांनी धारण केले आहे. सार्वजनिक शेअर होल्डिंगपैकी म्युच्युअल फंड संस्थांनी कंपनीचे 2.84 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आणि परकीय गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 5.93 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी 16.13 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| LT Foods Vs Mishthann Share today on 25 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं