Zen Tech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! झेन टेक्नॉलॉजी शेअरने अवघ्या 9 महिन्यात 317 टक्के परतावा दिला, भरवशाचा स्टॉक खरेदी करणार?

Zen Tech Share Price | झेन टेक्नॉलॉजी या संरक्षण साहित्य बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षात झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 317 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी होण्याची शक्यता आहे. कारण भारत सरकारने कंपनीला 227.6 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर दिली आहे.
त्यामुळे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 755.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत होती. आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 3.28 टक्के वाढीसह 781.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
कंपनीची कामगिरी
झेन टेक्नॉलॉजीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6,345.76 कोटी रुपये आहे. भारत सरकारकडून या कंपनीला विविध ऑर्डर मिळाल्या आहेत. 5 सप्टेंबर 2023 रोजी भारतीय संरक्षण मंत्रालयाने झेन टेक्नॉलॉजी कंपनीला 123.3 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. 30 जून 2023 रोजी कंपनीच्या ऑर्डर बुक ५४२ कोटी रुपये होती.
31 ऑगस्ट 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजीज कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 72.29 कोटी रुपये होता. आता पुन्हा कंपनीला 227.6 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. 17 ऑगस्ट 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 912 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
इतर व्यावसायिक तपशील
झेन टेक्नॉलॉजी कंपनीने 130 पेक्षा जास्त पेटंटसाठी अर्ज केला आहे. यापैकी 50 पेक्षा जास्त पेटंटला मंजुरी मिळाली आहे. आणि कंपनीने 1000 पेक्षा अधिक प्रशिक्षण प्रणाली जगभरात पाठवल्या आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या जून तिमाहीत झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण उत्पन्न एका वर्षात 39 कोटी रुपयेवरून वाढून 135 कोटी रुपये किमतीवर पोहचले आहेत. जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 6 पट वाढून 48 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आणि कंपनीचा खर्च 130 टक्क्यांच्या वाढीसह 28 कोटी रुपयेवरून वाढून 65 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Zen Tech Share Price today on 26 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं