Yes Bank Share Price | येस बँकेने दिली महत्त्वाची माहिती, येस बँक शेअर प्राईसवर नेमका काय परिणाम होणार? तज्ज्ञ काय सांगतात?

Yes Bank Share Price | देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक येस बँकेने आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी आपल्या बिझनेस अपडेटमध्ये माहिती (Yes Bank News) दिली आहे. बँकेचे म्हणणे आहे की, दुसऱ्या तिमाहीत बँकेचे कर्ज 9.5 टक्क्यांनी वाढून २.१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ही तिमाही आधारावर 5.2 टक्क्यांची वाढ आहे. Yes Bank Share
बँकेने आपल्या अपडेटमध्ये म्हटले आहे की, दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या ठेवींमध्ये वार्षिक आधारावर 17.2 टक्के आणि तिमाहीआधारे 6.8 टक्के वाढ झाली आहे. मंगळवारी येस बँकेचा शेअर 0.58 टक्क्यांनी घसरून 17.15 रुपयांवर बंद झाला. या अपडेटनंतर बुधवारी बँकेच्या शेअरवर नजर ठेवली जाणार आहे. Share Price of Yes Bank
पहिल्या तिमाहीत बँकेच्या नफ्यात वाढ
येस बँकेचा निव्वळ नफा 2022-23 च्या एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत 2023-24 च्या एप्रिल-जून तिमाहीत 342 कोटी रुपयांनी वाढला आहे. बँकेच्या नफ्यात ही वाढ 10.13 टक्के होती. या कालावधीत खासगी क्षेत्रातील बँकेच्या एनआयआयमध्येही वाढ झाली असून, या कालावधीत बँकेचा एनआयआय 1850 कोटीरुपयांवरून 1999.6 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
येस बँके – शेअरहोल्डिंगबद्दल
येस बँकेच्या शेअरहोल्डिंगबद्दल बोलायचे झाले तर म्युच्युअल फंडांनी जून 2023 तिमाहीत होल्डिंग0.12% वरून 0.16% पर्यंत वाढवले आहे. तर एफआयआय/एफपीआयने होल्डिंग्स 23.10 टक्क्यांवरून 23.79 टक्क्यांपर्यंत वाढवली आहेत.
नुकतेच या खासगी बँकेने येस सिक्युरिटीज या आपल्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीतील 1.8 कोटी शेअर्स 55.75 रुपयांना खरेदी केले आहेत. येस सिक्युरिटीजचे १०० टक्के भागभांडवल येस बँकेकडे आहे. येस बँकेने यावर्षी मे महिन्यात रिझर्व्ह बँकेकडे १०० कोटी रुपयांचे अतिरिक्त भांडवल गुंतविण्यासाठी अर्ज केला होता.
येस बँकेचा शेअर – Yes Bank Share Price Today
येस बँकेचा शेअर मंगळवारी किरकोळ घसरणीसह 17.17 रुपयांवर बंद झाला होता, तर आज बुधवारी शेअर 0.87% तेजीसह 17.35 रुपयांवर ट्रेड (Yes Bank Share Price NSE) करत आहे. आणि एकूण बाजार भांडवल सुमारे 50,000 कोटी रुपये झाले. गेल्या महिन्याभरात येस बँकेच्या शेअरमध्ये सुमारे 8 टक्क्यांची घसरण झाली आहे. 2023 मध्ये ते 21 टक्क्यांनी कमी झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Yes Bank Share Price on 04 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं