Stocks To Buy | अल्पावधीत होईल कमाई! युनिपार्ट्स इंडिया शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस

Stocks To Buy| सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही युनिपार्ट्स इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावू शकता. शेअर बाजारातील तज्ञांनी युनिपार्ट्स इंडिया कंपनीचे शेअर्स 600 रुपये किमतीच्या जवळपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 785 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ज्ञांच्या मते युनिपार्ट्स इंडिया स्टॉक मोमेंटम इंडिकेटर आणि RSI सारखे निर्देशकावर पॅटर्न रिव्हर्सल दर्शवत आहेत. युनिपार्ट्स इंडिया कंपनीचे शेअर्स 600 रुपयेच्या पार गेल्यास अल्पावधीत 640 रुपये ते 666 रुपये किंमत स्पर्श करतील, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी युनिपार्ट्स इंडिया स्टॉक 0.74 टक्के घसरणीसह 575.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
शेअर बाजारातील तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, युनिपार्ट्स कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 785 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ज्ञांनी युनिपार्ट्स स्टॉक खरेदी करताना 575 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. युनिपार्ट्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 640 रुपये ते 563 रुपये दरम्यान ट्रेड करत आहेत.
मागील सहा महिन्यांत युनिपार्ट्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना आठ टक्के नफा कमावून दिला आहे. 13 एप्रिल 2023 रोजी युनिपार्ट्स इंडिया स्टॉक 515 रुपये या नीचांक किमतीच्या तुलनेत 15 टक्के वाढले आहेत.
युनिपार्ट्स इंडिया कंपनीची स्थापना 1994 साली झाली होती. युनिपार्ट्स इंडिया ही कंपनी मुख्यतः इंजिनीयर सिस्टम आणि सोल्यूशन्स सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. ही कंपनी ऑफ-हायवे मार्केटमध्ये सिस्टम आणि पार्टसचा पुरवठा करणारी आघाडीची कंपनी आहे. युनिपार्ट्स इंडिया ही कंपनी कृषी, बांधकाम, वनीकरण आणि खाणकाम या क्षेत्रात व्यवसाय करणार्या 25 देशांतील विविध ग्राहक कंपन्यांना आपल्या सेवा प्रदान करते.
युनिपार्ट्स कंपनीचे सध्या पाच उत्पादन सुविधा केंद्र चालू आहेत. त्यापैकी दोन केंद्र लुधियानामध्ये, एक विशाखापट्टण, आणि दोन नोएडामध्ये चालू आहेत. या कंपनीने नोएडामध्ये आपले एक वितरण सुविधा केंद्र देखील सुरू केले आहे.
युनिपार्ट्स इंडिया कंपनीने अमेरिकेत देखील आपली उत्पादन, गोदाम आणि वितरण सुविधा निर्माण केली आहे. युनिपार्ट्स इंडिया या कंपनीमध्ये प्रमोटरने 65.66 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी कंपनीचे एकूण 16.46 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Stocks To Buy for investment today on 08 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं