इतर पक्षातील आयात नेते आणि विधानपरिषदेवरील आमदारांची सेनेत चांदी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवबंधन बांधत शिवसेनेत दाखल झालेले राज्याचे माजी मंत्री आणि बीडचे राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर आणि विधान परिषदेचे पहिल्यांदाच सदस्य झालेले तसेच ‘महाराष्ट्राला भिकेला लावेन’ असं वादग्रस्त वक्तव्य करणारे तानाजी सावंत यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागल्याने शिवसेनेच्या विशेषत: जमिनीवर पक्ष वाढवणाऱ्या विधानसभा सदस्यांमध्ये प्रचंड नाराजीची भावना दिसून आली. विधानसभा परिषदेचे आमदार तानाजी सावंत हे देखील करोडपती व्यक्तिमत्व असल्याने आयत्यावेळी काही मोठी आर्थिक देवाणघेवाण झाली का अशी चर्चा देखील दबक्या आवाजात होऊ लागली आहे.
‘मातोश्री’च्या निकट असलेले विधान परिषद सदस्य अनिल परब, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पदरी तसेच सेनेच्या ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक जुन्या आमदारांच्या नशिबी यंदा देखील निराशाच आली आहे. काल आलेल्या क्षीरसागरांना मंत्री करताना राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर असे निष्ठावंत वंचित राहिले. सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ.दीपक सावंत अशा विधान परिषद सदस्यांना पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रीपद दिल्याने शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मातोश्रीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी तानाजी सावंत विधान परिषदेचे सदस्य असतानाही त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले.
जातीपातीचा विचार शिवसेनेत होत नाही असे नेहमीच कौतुकाने म्हटले जाते. जयदत्त क्षीरसागर हे तेली समाजाचे आहेत आणि राष्ट्रवादीत येताच त्यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्री केले. क्षीरसागर यांचे तेली समाजात वजन असले तरी हा समाज मोठ्या प्रमाणात आज भारतीय जनता पक्षासोबत आहे. अशावेळी क्षीरसागर यांना संधी देताना कोणता निकष लावला असा सवाल शिवसेनेच्या एका ज्येष्ठ आमदाराने नाव न देण्याच्या अटीवर केला. क्षीरसागर आणि सावंत यांना मंत्रीपदे दिल्याने शिवसेनेच्या जमिनीवरील नेत्यांना मंत्रिपदापासून दूरच ठेवल्याने पक्षात छुपी खदखद सुरु झाल्याचे वृत्त आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं