विधानसभा २०१९: आपल्या निधीसाठी ‘आपला दवाखाना’च्या नावाने १६० कोटींचा घोटाळा? सविस्तर

ठाणे : दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर शिवसेनेने ठाणे महापालिका हद्दीत ‘आपला दवाखाना’ नावाची संकल्पना सुरू करणार असून त्यासाठी सर्वप्रथम किसननगर आणि कळवा येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली ही योजना पूर्णतः फोल ठरली आहे आणि लोकं तेथे फिरकत सुद्धा नाहीत अशी माहिती आहे, तसेच ठाणे शहरातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत तब्बल २६ आरोग्य केंद्रांची गरज असताना केवळ पक्षाच्या प्रचाराच्या हेतूने आणि आरोग्याच्या नावाखाली या संकल्पनेसाठी तब्बल १६० कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा दावा महापालिका विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे मेडिकल ऑन गो प्रायव्हेट लिमिटेडला हा ठेका देऊन त्याद्वारे विधानसभा निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेने प्रस्तावित केलेल्या ‘आपला दवाखाना’ या योजनेस विरोध केला आहे. त्यावेळेस एनसीपीचे शहाराध्यक्ष आनंद परांजपे, ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, सुहास देसाई आणि मुकुंद केणी हे उपस्थित होते. महापालिकेने मेडिकल ऑन गो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्याचे प्रस्तावित केले आहे. दरम्यान आरोग्य केंद्र सुरू करताना दर ५०,००० नागरिकांमागे एक आरोग्य केंद्र असावे, असा सुद्धा नियम आहे. ठाणे शहराची लोकसंख्या सध्या २६ लाखांच्या घरात आहे, तसेच ठाणे शहरात सध्याच्या आकडेवारीनुसार एकूण २६ आरोग्य केंद्रांची गरज आहे. सद्यस्थितीत ठाण्यात शहरात २८ आरोग्य केंद्रे आहेत. त्यामुळे अतिरिक्त ५० केंद्र सुरू करून ठाणेकरांच्या १६० कोटी रुपयांची उधळपट्टीच केली जाणार आहे, असा आरोप मिलिंद पाटील यांनी केला आहे.
विशेष म्हणजे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ज्या सुविधा मोफत मिळत आहेत, त्या सुविधांसाठी ‘आपला दवाखाना’मध्ये १० रुपये दर आकारला जाणार आहे. ही संकल्पना सर्वात आधी शहरातील किसननगर आणि कळवा येथे राबवण्यात आली होती. मात्र, ती फोल ठरलेली आहे. या केंद्रावर एकही माणूस फिरकत नाही. तरीही, आणखी ५० ठिकाणी ही योजना राबवून त्या माध्यमातून टक्केवारी घेण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा आणि प्रशासनाचा प्रयत्न आहे, असा धक्कादायक आरोपही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला आहे. या योजनेसाठी महापालिकेला ५ वर्षांसाठी १४४ कोटी आणि भांडवली खर्चापोटी १५.६० कोटी असे १५९.६० कोटी मेडिकल ऑन गो प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीला द्यावे लागणार आहेत.
हा सर्व ठाणेकरांच्या पैशांचा अपव्ययच आहे, असा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. राज्याचे आरोग्यमंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही संकल्पना राबवण्यात आली होती आणि त्याचे लोकार्पण युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बुधवार, २० फेब्रुवारी रोजी झाले होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं