जागावाटपात स्वबळावर बार्गेनिंगसाठी? पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच : उद्धव ठाकरे

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत आपला मुख्यमंत्री करायचाच असा ठाम निर्धार शिवसेनेने केला असून भारतीय जनता पक्षाशी जरी युती असली तरी शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना असून आगामी विधानसभा भगवी करुन टाकू, त्यासाठी शिवसैनिकांनी सर्व शक्तीनिशी कामाला लागावे अशा शब्दांत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा सूचक इशारा दिला आहे. आज शिवसेनेचा ५४वा वर्धापन दिन असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
लोकसभा निवडणूकीपूर्वी भारतीय जनता पक्षावर अनेक वार करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर कोलांटीउडी घेत आणि राजकीय तडजोड करीत पुन्हा भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेतल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा युतीचा फॉर्म्युला, लोकसभा उपाध्यक्षपद आणि राम मंदिराचा मुद्दा यावरुन शिवसेनेची पुन्हा एकदा खदखद दिसून आली आहे. त्यानंतर आजच्या अग्रलेखात तर थेट शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना असून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी पक्क्या निर्धाराने कामाला लागण्याचा संदेश शिवसैनिकांना देण्यात आला आहे.
मागील ५२-५३ वर्षात शिवसेना नावाचे वादळ महाराष्ट्रात घोंघावत आहे. सुरुवातीला जनतेच्या अनेक छोट्यामोठ्या आंदोलनांद्वारे सुरुवात झालेल्या शिवसेनेने नंतरच्या काळात इथल्या भुमिपुत्रांच्या न्याय हक्कांचा लढा दिला. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी, पोटापाण्याच्या आणि रोजगाराच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला तेव्हा बाळासाहेब ठाकरेंवर अनेक वाऱ आणि घाव झाले तसेच त्यावेळी शिवसेनेत छगन भुजबळ, राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यासारखे आक्रमक नेते असल्याने पक्ष ग्रामीण भागात देखील तितकाच पसरला होता. आपल्याच माणसांच्या बाजूने उभे राहणे त्यांच्यासाठी गुन्हा ठरला. आता हीच शिवसेनेची भुमिपुत्रांची भुमिका घेऊन पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तिथल्या भुमिपुत्रांसाठी लढत आहेत. इतकेच नव्हे दक्षिणेतील प्रत्येक राज्य प्रांतीक अस्तितेचे राजकारण करीत आहेत. राष्ट्रीय पक्षही प्रादेशिक पक्षाशी युत्या-आघाडय़ाकरून आपला आकडा वाढवीत आहेत. शिवसेनाप्रमुखांनीच हा प्रांतीय अस्मितेचा विचार मांडला होता त्याला देशाने स्विकारले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे महत्व विषद केले आहे.
शिवसेनेचे हिंदुत्व हे केवळ सांस्कृतीक अंगाने जाणारे हिंदुत्व नव्हते, शिवसेनाप्रमुखांची भुमिका सर्वसमावेशक होती. प्रश्न केवळ धर्माचा नाही, देशात अनेक धर्म असून शकतील पण घटना आणि कायदे सर्वांसाठी आजही एकच हवेत. आचारात-विचारात समानता हवी, अशी कायमच शिवसेनेची भुमिका राहिलेली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपत आहे, अशा शब्दांत वर्धापनदिनी आपली धर्मनिरपेक्ष भुमिका मांडण्याचा प्रयत्नही उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखातून केला आहे.
शिवसेनेचा जन्म मराठीच्या न्याय हक्कांसाठी झाला असला तरी आजची शिवसेना अनेक अंगाने आणि बदललेल्या राजकीय समीकरणामुळे अमराठी जनतेच्या आहारी गेल्याचे दिसते. मराठीला गृहीत धरून मी मुंबईकरच्या नावाने शहरी भागात देखील शिवसेनेने उत्तर भारतीय समाजापुढे मतांसाठी अक्षरशः लोटांगण घातल्याचे अनेक दाखले आहेत. त्यामुळेच जी बाळासाहेबांची शिवसेना मराठीच्या हक्कांसाठी जन्माला आली, तीच आज शहरी भागात उत्तर भारतीयांचे सन्मान मेळावे भरवताना दिसत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं