Multibagger Stocks | दणादण पैसा देतोय सरकारी कंपनीचा शेअर! ऑर्डरबुक मजबूत, अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देतोय

Multibagger Stocks | मागील काही महिन्यांपासून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 205.23 टक्के नफा कमावून दिला आहे.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के घसरणीसह 2,146.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच या कंपनीने भारतीय संरक्षण मंत्रालयासोबत 310 कोटी रुपये मूल्याचा करार केला आहे. ज्यात भारतीय तटरक्षक दलासाठी प्रशिक्षण जहाज बांधण्याचे काम देण्यात आले आहे.
मागील 6 महिन्यांत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 716 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. याकाळात शेअरची किंमत 201.31 टक्के वाढून 1,441.75 रुपये किमतीवर पोहचली आहे.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2,157.95 रुपये किमतीवर पोहचले होते. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2,484.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 612.00 रुपये होती. माझगाव डॉक स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 53.8 अंकावर ट्रेड करत आहे. याचा अर्थ हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाहीये.
माझगाव डॉक कंपनीने जून तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 40 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 224.8 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. जो आता 314 कोटी रुपयेवर पोहचला आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीचा ऑपरेशनल महसूल वर्ष-दर-वर्ष आधारे 2.6 टक्क्यांच्या घसरणीसह 2,172.8 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीचे जुने नाव माझगाव डॉक लिमिटेड असे होते.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही एक शिपयार्ड कंपनी असून मुंबई, माझगाव येथे स्थित आहे. ही कंपनी भारतीय नौदलासाठी युद्धनौका आणि पाणबुड्या बनवण्याचे, तसेच ऑफशोअर ऑइल ड्रिलिंगसाठी ऑफशोर प्लॅटफॉर्म आणि संबंधित सपोर्ट वेसल्स बनवण्याचे काम करते. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीच्या मुख्य व्यवसायात जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि ऑफशोअर संरचना बांधकाम हे काम सामील आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks for investment on 19 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं